Rhea Chakraborty: तोंडावर पडता पडता वाचली रिया चक्रवर्ती; पापाराझींवर राग काढताच भडकले नेटकरी

या व्हायरल व्हिडीओत रिया पायऱ्या चढताना दिसतेय. मात्र या पायऱ्या चढताना ती अडखळते आणि तोंडावर पडता पडता वाचते. तिला धडपडताना पाहिल्यानंतर पापाराझी तिला सांभाळून चालण्यास सांगतात.

Rhea Chakraborty: तोंडावर पडता पडता वाचली रिया चक्रवर्ती; पापाराझींवर राग काढताच भडकले नेटकरी
Rhea ChakrabortyImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 18, 2023 | 10:21 AM

मुंबई: अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही बॉलिवूडमधल्या सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. रिया नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकताच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती चालता चालता धडपडताना दिसत आहे. मात्र हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी रियावर खूप भडकले आहेत. ‘हिला स्वत:ची चूक मान्य करायला नको’ असं म्हणत नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे.

या व्हायरल व्हिडीओत रिया पायऱ्या चढताना दिसतेय. मात्र या पायऱ्या चढताना ती अडखळते आणि तोंडावर पडता पडता वाचते. तिला धडपडताना पाहिल्यानंतर पापाराझी तिला सांभाळून चालण्यास सांगतात. फोटोग्राफर्स तिच्या मागून व्हिडीओ शूट करत जात असतात. अशा वेळी रियाला धडपडतानाही ते कॅमेऱ्यात शूट करतात. मात्र त्यानंतर रिया त्यांच्यावर रागावल्याचं पहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

“माझा पाठलाग का करत आहात” असं म्हणत ती पापाराझींवर नाराज होते. रियाच्या याच वागणुकीमुळे नेटकरी तिच्यावर चिडले आहेत. रिया स्वत: चालताना धडपडली, मग त्यात पापाराझींचा काय दोष, असा सवाल एका युजरने केला. तर ‘ही दुसऱ्याची चूक कशी काय असू शकते? तिला स्वत:ची चूक मान्य करायची नाही’, असं दुसऱ्याने लिहिलं आहे. ‘अजून किती खाली पडशील’ असा उपरोधिक टोलाही नेटकऱ्यांनी तिला लगावला आहे.

काही दिवसांपूर्वी रिया तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आली होती. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाच्या दोन वर्षांनंतर ती पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचं म्हटलं जात आहे. रिया बंटी सजदेहला डेट करत असल्याची जोरदार चर्चा आहे.

कोण आहे बंटी सजदेह?

बंटी हा सीमा सजदेहचा भाऊ आहे. सीमा ही अभिनेता, दिग्दर्शक सोहैल खानची पूर्वाश्रमीची पत्नी आहे. बंटी हा एका कॉर्नरस्टोन या टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीचा सीईओ आहे. ही टॅलेंट कंपनी क्रिकेटर्स आणि बॉलिवूड स्टार्ससोबत काम करते. बंटी हा अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला डेट करत असल्याची चर्चा होती. इतकंच नव्हे तर हे दोघं एकमेकांशी लग्न करणार होते. मात्र काही कारणास्तव त्यांचं ब्रेकअप झालं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.