Sushant Rhea | ‘कशाला ढोंग करतेस?’, सुशांतसोबतचा खास व्हिडीओ पोस्ट केल्याप्रकरणी रिया चक्रवर्ती ट्रोल

रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूत हे एकमेकांना डेट करत होते. सुशांतच्या 36 व्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर फोटो पोस्ट तिने रिलेशनशिप जाहीर केलं होतं. हे दोघं 2020 च्या अखेरीस लग्न करणार होते, अशीही चर्चा होती.

Sushant Rhea | 'कशाला ढोंग करतेस?', सुशांतसोबतचा खास व्हिडीओ पोस्ट केल्याप्रकरणी रिया चक्रवर्ती ट्रोल
रिया चक्रवर्तीने शेअर केला सुशांतसोबतचा व्हिडीओImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 14, 2023 | 2:19 PM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला आज (14 जून) तीन वर्षे पूर्ण झाली. टेलिव्हिजनकडून बॉलिवूडकडे वळालेल्या सुशांतचा मोठा चाहतावर्ग आहे. 14 जून 2020 रोजी मुंबईतल्या वांद्रे इथल्या राहत्या घरी तो मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूचा तपास अद्याप सीबीआयकडून केला जात आहे. सोशल मीडियावर सध्या चाहत्यांकडून सुशांतच्या आठवणी शेअर केल्या जात आहेत. यादरम्यान अभिनेत्री रिया चक्रवर्तीने पोस्ट केलेला खास व्हिडीओ चर्चेत आला आहे. रियाने सुशांतचा कधीही न पाहिलेला व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

रियाने पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये ती सुशांतसोबत दिसतेय. व्हेकेशनदरम्यानचा हा व्हिडीओ असून एका मोठ्या दगडावर दोघंही बसलेले आहेत. यामध्ये रिया सुशांतला पाठून मिठी मारताना दिसत आहे. तर सुशांतसुद्धा तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतोय. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडमध्ये ‘विश यू वर हिअर’ हे गाणं ऐकायला मिळत आहे. रियाने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये हृदयाचा आणि इन्फिनिटीचा इमोजी पोस्ट केला आहे.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूत हे एकमेकांना डेट करत होते. सुशांतच्या 36 व्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर फोटो पोस्ट तिने रिलेशनशिप जाहीर केलं होतं. हे दोघं 2020 च्या अखेरीस लग्न करणार होते, अशीही चर्चा होती. मात्र त्याच वर्षी जून महिन्यात सुशांत मृतावस्थेत आढळला होता.

14 जून 2020 रोजी सुशांत त्याच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याच्या निधनाच्या वृत्ताने चाहत्यांना आणि बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला होता. सुशांतच्या मृत्यूनंतर ड्रग्जच्या अँगलने तपास करताना एनसीबीने रिया आणि तिचा भाऊ शौविकला अटक केली होती. जवळपास महिनाभर तुरुंगात राहिल्यानंतर दोघांची जामिनावर सुटका झाली. सुशांतच्या निधनाच्या अडीच वर्षानंतर रियाने टेलिव्हिजनवर कमबॅक केलं. एमटीव्ही रोडीजच्या 19 व्या सिझनमध्ये ती गँग लीडर म्हणून सहभागी झाली आहे. तिच्यासोबत प्रिन्स नरुला, गौतम गुलाटी आणि सोनू सूद हेसुद्धा गँग लीडर आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.