मुस्लीम मुलाशी लग्न करण्याविषयी रिचा म्हणाली, “जर तुमचं कुटुंबच तुमच्या..”

| Updated on: Jun 05, 2024 | 11:21 AM

अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अली फजल हे 2020 मध्ये लग्नबंधनात अडकले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रिचा आंतरधर्मीय लग्न करण्याविषयी व्यक्त झाली. रिचा आणि अलीने विशेष विवाह कायद्यांतर्गत लग्न केलं. या लग्नाला घरातूनही पाठिंबा होता, असं रिचाने सांगितलं.

मुस्लीम मुलाशी लग्न करण्याविषयी रिचा म्हणाली, जर तुमचं कुटुंबच तुमच्या..
Richa Chadha and Ali Fazal
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अली फजल यांच्या घरात लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं किंवा पाहुणीचं आगमन होणार आहे. ‘फुकरे’ या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. या भेटीचं रुपांतर आधी मैत्रीत आणि नंतर हळूहळू प्रेमात झालं. 2020 मध्ये लॉकडाऊनदरम्यान रिचा आणि अलीने मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. रिचा आणि अली यांचा धर्म वेगळा असून लग्नाच्या वेळी काही समस्या निर्माण झाल्या का, याविषयी अभिनेत्री नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त झाली. अली फजलशी लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्या निर्णयाला कोणी विरोध केला होता का, असा प्रश्न तिला या मुलाखतीत विचारण्यात आला.

‘गलाटा इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत रिचा म्हणाली, “तुम्ही घेतलेल्या निर्णयाबद्दल जर ठाम राहिलात आणि तुमचे कुटुंबीय तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले तर बाकी कोणत्याच गोष्टींनी फरक पडत नाही. माझ्या मते माणूस हा सर्वांत आधी माणूस असतो. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या प्रेमात पडता, तेव्हा त्यात कोणतेच फिल्टर्स नसतात. तुम्ही प्रेमात असता, तेव्हा प्रेम ही एकच भावना महत्त्वाची असते.”

हे सुद्धा वाचा

या मुलाखतीत रिचाला त्या रेस्टॉरंटबद्दल विचारलं गेलं जिथे ती अलीसोबत रिलेशनशिपच्या सुरुवातीला जात होती. त्यावर तिने सांगितलं, “माझ्या कुटुंबीयांना रिलेशनशिपविषयी बाहेरून कळावं अशी माझी अजिबात इच्छा नव्हती. जेव्हा मी घरी माझ्या कुटुंबीयांसोबत याबद्दल बोलण्यास तयार होती, तेव्हा मी त्यांना सर्वकाही सांगितलं. त्यानंतर आम्ही मोकळेपणे फिरू लागलो.” रिचाने सांगितलं की जेव्हा ‘व्हिक्टोरिया अँड अब्दुल’च्या प्रीमिअरसाठी व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये जायचं होतं, तेव्हा तिने आणि अलीने त्यांचं रिलेशनशिप जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता.

“मला आठवतंय की ‘व्हिक्टोरिया अँड अब्दुल’च्या प्रीमिअरसाठी मला अलीसोबत व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये जायचं होतं. आमच्यासोबत इंग्लिश अभिनेत्री जुडी डेंचसुद्धा येणार होत्या. त्यामुळे जगाचा विचार करून मी तो क्षण गमावणार नाही, हे मी अलीला स्पष्ट केलं होतं. त्यावर त्याचं म्हणणं होतं की अजून आपण कोणालाच नात्याविषयी सांगितलं नाही. तेव्हा मी म्हटलं की, चल सांगुयात. हीच योग्य वेळ आहे”, असं ती पुढे म्हणाली. रिचा आणि अलीने 2020 मध्ये विशेष विवाह कायद्यांतर्गत लग्न केलं.