भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत ऐश्वर्याचा दुसरा क्रमांक, पहिल्या क्रमांकावर ‘ही’ अभिनेत्री

Richest Actresses In India: सिनेमांमध्ये नाही सक्रिय तरी भारतातील सर्वांत अभिनेत्रींच्या यादीत 'ही' अभिनेत्री, 4600 कोटींची मालकीण.... दुसऱ्या क्रमांकावर ऐश्वर्या, टॉप 5 मध्ये 'या' अभिनेत्री..., सध्या सर्वत्र श्रीमंत अभिनेत्रींची चर्चा...

भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत ऐश्वर्याचा दुसरा क्रमांक, पहिल्या क्रमांकावर 'ही' अभिनेत्री
Follow us
| Updated on: Oct 18, 2024 | 8:17 AM

Richest Actresses In India: भारताती टॉप 10 श्रीमंत अभिनेत्रींची यादी समोर आली आहे. या लिस्टमध्ये अभिनेत्री आलिय भट्ट हिच्यापासून अभिनेत्री दीपिका पादुकोण यांची देखील नावे आहेत. यादीमध्ये 90 दशकातील एक अभिनेत्री अव्वल स्थानी आहे. जी अभिनेत्री पहिल्या क्रमांकावर आहे ती आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी गडगंज श्रीमंत आहे. तर दुसऱ्या स्थानावर अभिनेत्री ऐश्वर्या राय आहे… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रीमंत अभिनेत्रींच्या नावाची चर्चा रंगली आहे.

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री जुही चावला आहे. जुही चावला ही भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे. हुरूनने भारतातील 10 श्रीमंत अभिनेत्रींची यादी घोषित केली आहे. यादीमध्ये जुही चावला पहिल्या क्रमांकावर आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून जुही हिने एकही हीट सिनेमा बॉलिवूडला दिलेला नाही, तरी देखील अभिनेत्री गडगंज पैसा कमावते. जुही चावला हिच्या नेटवर्थबद्दल सांगायचं झालं तर, रिपोर्टनुसार, जुही चावलाची नेटवर्थ 4600 कोटी रुपये आहे. गेल्या 10 वर्षांपासून जुही अभिनयापासून दूर आहे. जुही चावला शाहरुख खानच्या रेड चिलीज आणि आयपीएल टीम कोलकाता नाईट रायडर्समधून बक्कळ पैसे कमवते. याशिवाय अभिनेत्री रिअल इस्टेट कंपनीत गुंतवणूक करते.

दुसऱ्या क्रमांकावर ऐश्वर्या राय

हुरुनने जारी केलेल्या लिस्टमध्ये ऐश्वर्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. जुही चावला हिच्याप्रमाणे ऐश्वर्या देखील बॉलिवूडमध्ये सक्रिय नाही. रिपोर्टनुसार, ऐश्वर्या राय हिची नेटवर्थ 850 कोटी रुपये आहे. अभिनय क्षेत्रात सक्रिय नसली तरी ऐश्वर्या गडगंज पैसे कमवते.

तिसऱ्या क्रमांकावर अभिनेत्री प्रियांका चोप्रा आहे. प्रियांका चोप्रा तिच्या ब्रँड, प्रॉडक्शन कंपनी आणि हॉलिवूडट सिनेमांमधून कमाई करते. अभिनेत्रीकडे एकूण 650 कोटी रुपयांची संपत्ती आहे. आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण यांचा देखील टॉप 5 मध्ये समावेश आहे. आलिया आणि दीपिका बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्री आहेत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.