आधी लव्ह, लव्ह, लव्ह नंतर लग्नही केलं पण मग मोडलं का? सुशील ,संस्कारी टीव्ही सुनांचं वास्तवादी आयुष्य !

आजही बर्‍याच लोकांचा असे वाटते की, प्रेम विवाह अधिक काळ टिकतात कारण हे जोडपे लग्नाच्या अगोदर एकमेंकाना वेळ देतात.

आधी लव्ह, लव्ह, लव्ह नंतर लग्नही केलं पण मग मोडलं का? सुशील ,संस्कारी टीव्ही सुनांचं वास्तवादी आयुष्य !
Follow us
| Updated on: Feb 03, 2021 | 10:17 AM

मुंबई : आजही बर्‍याच लोकांचा असे वाटते की, प्रेम विवाह अधिक काळ टिकतात कारण हे जोडपे लग्नाच्या अगोदर एकमेंकाना वेळ देतात. मात्र, याला अपवाद टिव्ही पडद्यावर दिसणारे अभिनेते आणि अभिनेत्री आहेत. कारण टिव्ही इंडस्ट्रीतील बरेच असे जोडपे आहेत त्यांचे लग्न टिकले नाहीत. काही व्यक्तींच्या आयुष्यात लग्नानंतर खूप मोठी वादळे येतात जी त्यांचं आयुष्य उध्वस्त करुन जातात. साहजिकच त्या व्यक्तींना लग्नाच्या आठवणी विस्मृतीत जाव्याशा वाटतात. (Riddhi Dogra-Rakesh Bapat, Rashmi Desai-Nandish Sandhu’s marriage broke up due to love marriage in TV industry)

रिद्धि डोगरा- राकेश बापट रिद्धि डोगरा आणि राकेश बापट हेही त्या टीव्ही जोडप्यांपैकी एक आहे ज्यांचे नातं जास्त काळ टिकू शकले नाही. दोघांमधील प्रेम, जिवाळा दिसत होता. पण यानंतर दोघांनी 2019 मध्ये त्यांचे सात वर्ष जुने नाते संपवले. टीव्ही सीरियल ‘मेरीदादा’ च्या सेटवर दोघांची भेट झाली होती, त्यानंतर या दोघांनी 2011 मध्ये लग्न केले होते. मात्र, लग्नाच्या काही वर्षानंतरच त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला, त्यानंतर या दोघांनीही वेगळे होणे अधिक चांगले समजून घटस्फोट घेतला. घटस्फोटाविषयी बोलताना राकेशने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘कधीकधी वेगळे होण्याचे कारण नसते. आम्ही अजूनही एकमेकांवर प्रेम करतो. फरक इतकाच आहे की आपल्या बाबतीत प्रेमाची व्याख्या बदलली आहे.

sachin shrop

जूही परमार-सचिन श्रॉफ टीव्ही सीरियल ‘कुमकुम’ च्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये पोहचलेली अभिनेत्री जूही परमार आणि अभिनेता सचिन श्रॉफ हे देखील एक प्रसिध्द जोडपे होते. सचिन आणि जुही यांची भेट ‘कुमकुम’ मालिकेच्या सेटवर झाली आणि दोघांनी 2009 मध्ये लग्न केले. असे म्हणतात की, लग्नाच्या एक-दोन वर्षानंतर, त्यांच्या नात्यातील अंतर येऊ लागले, त्यानंतर 2018 मध्ये दोघेही एकमेकांपासून विभक्त झाले. दोघांनी त्यांच्या तुटलेल्या लग्नाबद्दल एकमेकांवर आरोप केले होते, त्यामध्ये प्रेमाचा अभाव हे सर्वात मोठे कारण होते.

रश्मि देसाई-नंदीश संधू रश्मी देसाई आणि नंदीश संधू टीव्ही सीरियल ‘उतरान’ च्या सेटवर भेटले, त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या. या दोघांनीही बरेच दिवस आपले नातं लपवून ठेवलं होतं पण 2012 मध्ये त्यांनी अचानकपणे लग्न करून सर्वांना चकित केले. पण दुर्दैवाने त्यांचे लग्न फार काळ टिकू शकले नाही आणि 4 वर्षातच दोघांनी आपलं नातं संपवण्याचा निर्णय घेतला. असे म्हटले जाते की, त्यांच्या घटस्फोटाचे कारण म्हणजे नंदीशचे इतर महिलांशी अवैध संबंध होते. इतकेच नव्हे तर घटस्फोटाविषयी बोलताना रश्मी म्हणाली होती की, ‘नंदीशने हे नाते टिकवळ्यासाठी 100% प्रयत्न केला असता तर कदाचित हे नातं कधीच तुटलं नसतं.

rashmi desai

डलनाज ईरानी-राजीव पॉल डलनाज इराणी आणि राजीव पॉल यांची 1993 मध्ये प्रसिद्ध कार्यक्रम परिवर्तनच्या सेटवर भेट झाली होती. बर्‍याच वर्षांपासून एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 1998 साली लग्न केले आणि त्यानंतर 12 वर्षांनंतर त्यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचे ठरविले. 2010 मध्ये या जोडप्याने विभक्त होण्यासाठी अर्ज केला होता, त्यानंतर दोन वर्षानंतर 2013 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर डलनाज ईरानी-राजीव पॉल यांनी तुटलेल्या लग्नानंतर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले.

karan singh grober

जेनिफर विंगेट-करण सिंह ग्रोवर जेनिफर विंगेट आणि करणसिंग ग्रोव्हर हे टीव्हीवरील काही खास जोडप्यांपैकी एक होते ज्यांनी एकमेकांवर उघडपणे प्रेम केले होते. पण जेव्हा त्यांनी घटस्फोट घेणार आहेत हे समजल्यानंतर अनेकांना एक प्रकारे धक्काच बसला होता. त्यांच्या कुटुंबियांनी या दोघांचे लग्न टिकवण्यासाठी बराच प्रयत्न केला मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आणि शेवटी यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर करणने 2016 मध्ये शेवटी अभिनेत्री बिपाशा बसूसोबत लग्न केले. करणच्या आणि बिपाशाच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. आणि आताही करण आणि बिपाशा सुखाने संसार करताना दिसत आहेत.

संबंधित बातम्या : 

जगप्रसिद्ध पॉपस्टारच्या ट्विटला उत्तर देताना कंगना म्हणते, आंदोलन करणारे शेतकरी नाहीत तर दहशतवादी !

कुणाच्याही वाट्याला असे दिवस येऊ नयेत, लग्न झाल्यानंतर या 5 अभिनेत्रींनी नरक यातना सोसल्या…!

Video | रितेशसोबत नाचताना खाली पडली जेनेलिया, अभिनेत्याने शेअर केला गमतीदार व्हिडीओ!

(Riddhi Dogra-Rakesh Bapat, Rashmi Desai-Nandish Sandhu’s marriage broke up due to love marriage in TV industry)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.