Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिद्धीमा कपूर हिने केला आलिया भट्ट हिच्याबद्दल मोठा खुलासा, थेट म्हणाली, ती कायमच….

आलिया भट्ट हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. आलिया भट्टची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. आलिया भट्ट हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे तिचे चित्रपट धमाकाही करताना दिसत आहेत.

रिद्धीमा कपूर हिने केला आलिया भट्ट हिच्याबद्दल मोठा खुलासा, थेट म्हणाली, ती कायमच....
Alia Bhatt
Follow us
| Updated on: Oct 24, 2024 | 8:27 PM

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. आलिया भट्टची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. आलिया भट्टचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहे. विशेष बाब म्हणजे आलियाचे हे चित्रपट धमाका करताना दिसत आहेत. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लेकीचे नाव राहा असून राहाचे कायमच फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. आलिया आणि रणबीर कपूर यांनी काही वर्ष डेट केल्यानंतर लग्न केले. अत्यंत खासगी पद्धतीने या दोघांनी लग्न केले. आलिया ही सोशल मीडियावरही सक्रिय दिसते.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यासोबत विदेशात जाताना काही दिवसांपूर्वीच नीतू कपूर या दिसल्या. आता आलिया भट्ट हिची ननंद रिद्धीमा कपूर हिने आलिया भट्ट हिच्याबद्दल मोठा खुलासा केलाय. रिद्धीमा कपूर हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्येच ती आलिया भट्टबद्दल बोलताना दिसली.

रिद्धीमा कपूर म्हणाली की, कपूर कुटुंबाचे सदस्य होण्यासाठी आलियाने खरोखरच मनापासून खूप प्रयत्न केले आहेत. आम्ही दोघी बऱ्यापैकी वेळ घालवतो. आम्ही नेहमीच आलियाला तिचा स्पेस देतो. दररोज आलियाला मी कॉल करत नाही. पुढे रिद्धीमा कपूर म्हणाली की, कुटुंबासोबत राहण्यासाठी आलिया मनापासून प्रयत्न करते.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी एप्रिल 2022 मध्ये लग्न केले. लग्नाच्या काही दिवसांमध्येच आलिया भट्ट हिने मुलीला जन्म दिला. काही दिवसांपूर्वीच आलिया, नीतू कपूर, राहा आणि रणबीर कपूर हे स्पॉट झाले. नवीन घराचे बांधकाम पाहण्यासाठी हे सर्वजण पोहोचले होते. यावेळी राहा ही आलियाकडे होते.