शुभमन गिलच्या प्रेमात ही प्रसिद्ध अभिनेत्री? नात्याच्या चर्चांवर सोडलं मौन
एका प्रसिद्ध अभिनेत्रीचं नाव सतत क्रिकेटर शुभमन गिलशी जोडलं जात आहे. या चर्चांवर तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली. शुभमन गिल खूपच क्युट आहे, असंदेखील ती म्हणाली.
अभिनेत्री रिद्धिमा पंडितने बऱ्याच हिट मालिकांमध्ये काम करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. ‘बहु हमारी रजनीकांत’ या मालिकेमुळे तिला विशेष प्रसिद्धी मिळाली. यामध्ये तिने रोबोटची भूमिका साकारली होती. गेल्या काही दिवसांपासून रिद्धिमा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. कारण तिचं नाव क्रिकेटर शुभमन गिलशी जोडलं जातंय. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर शुभमन हा रिद्धिमाला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं. या दोघांचं नाव अचानक कसं काय जोडलं गेलं, याबद्दल अद्याप काही स्पष्टता नाही. मात्र रिद्धिमाने वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये त्यावर प्रतिक्रिया देत चर्चांना फेटाळलं आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती शुभमनविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. तिने त्याला भेटण्याचीही इच्छा बोलून दाखवली आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रिद्धिमाला विचारलं गेलं की ती खरंच शुभमनला डेट करतेय का? त्यावर उत्तर देत ती म्हणाली, “नाही, मी त्याला ओळखतसुद्धा नाही. मात्र मला त्याला एकदा नक्की भेटायचं आहे. जर मी त्याला डेट करत असती तर गोष्ट वेगळी असती. पण आम्ही एकमेकांना ओळखतही नाही. तो उत्तम खेळाडू आहे, इतकंच मला त्याच्याविषयी माहित आहे. त्याव्यतिरिक्त मला त्याच्याविषयी काहीच माहीत नाही.”
View this post on Instagram
“जर एकेदिवशी मी त्याला भेटले तर नक्कीच या चर्चांना आठवून आम्ही त्यावर खूप हसू. शुभमन खूप क्युट आहे. पण आम्हा दोघांमध्ये सध्या तरी असं काहीच नाही आणि भविष्यातही होणार नाही. इतक्या चर्चांनंतर मला शुभमनला भेटायची इच्छा झाली आहे. मी त्याला एकदा नक्की भेटीन”, असं ती पुढे म्हणाली.
लग्न आणि गरोदरपणाविषयी बोलताना रिद्धिमा एका मुलाखतीत म्हणाली होती, “मी भविष्यात कोणाशी लग्न करेन मला माहित नाही. मला योग्य जोडीदार मिळेल की नाही यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत. गेल्या काही वर्षांत अनेक महिलांनी एग्ज फ्रिजिंगचा पर्याय निवडला आहे. ती प्रक्रिया झाल्याने आता मी गरोदरपणाबद्दल निश्चिंत झाले आहे.” रिद्धिमाचं नाव याआधी अभिनेता हृतिक रोशनचा चुलत भाऊ एहसान रोशनशीही जोडलं गेलं होतं. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही.