माझा हात खेचल्यांमुळे एका…, गर्दीत घडलेल्या ‘त्या’ घटनेवर रिंकू राजगुरूचं स्पष्ट वक्तव्य

Rinku Rajguru : 'सैराट' सिनेमामुळे अभिनेत्री रिंकू राजगुरू हिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. अभिनेत्री एक झलक पाहण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. दरम्यान नुकताच एका कार्यक्रमात घडलेल्या एका घटनेवर रिंकू हिने स्पष्ट वक्तव्य केलं आहे.

माझा हात खेचल्यांमुळे एका..., गर्दीत घडलेल्या 'त्या' घटनेवर रिंकू राजगुरूचं स्पष्ट वक्तव्य
Follow us
| Updated on: Mar 06, 2024 | 8:20 AM

मुंबई | 6 मार्च 2024 : ‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अभिनेत्रीची एक झलक पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक असतात. नुकताच, रिंकू जळगाव येथील महासांस्कृतिक कार्यक्रमात हजेरी लावली होती. कार्यक्रमात जमलेल्या काही लोकांनी धक्काबुक्की केली आणि ज्यामुळे अभिनेत्री चिडली…असं गेल्या काही दिवसांपासून सांगण्यात येत आहे. पण आता यावर खुद्द रिंकू हिने सोशल मीडियावर एक पोस्ट करत स्पष्टीकरण दिलं आहे.

सोशल मीडियावर एक पोस्ट करत रिंकू म्हणाली, ‘जळगावमधील कार्यक्रमावर माझं मत. नुकताच मी एका कार्यक्रमासाठी जळगावला गेले होते. तिथे गर्दीमध्ये मी चाहत्यांवर ओरडले अशा बातम्या प्रसारमाध्यमात पसरवल्या जात आहेत. कार्यक्रमाठिकाणी अशी कोणतीच घटना झाली नसून माझा हात खेचल्यामुळे एका Representative शी मी नम्रपणे बोलले आहे. माझा माझ्या प्रेक्षकांवर पूर्ण विश्वास आणि प्रेम आहे. त्यांचा मी नेहमीच आदर करते. त्यामुळे अशा बातम्या पसरवू नये, ही विनंती, तुमची रिंकू…’ सध्या रिंकू हिची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

तुमची मुलगी असती तर..

जगळगावमध्ये झालेल्या कार्यक्रमात रिंकू प्रेक्षकांवर ओरडली असं सांगण्यात येत आहेत. ‘तुमच्या मुलीला जर कोणी धक्काबुक्की केली तर चालेल का?’ असा जाब रिंकूने चाहत्यांना विचारला असं सांगण्यात येत होतं. पण यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्रीने खुलासा केला आहे. ज्यामुळे कार्यक्रमात असं काहीही घडलं नव्हतं… अशी माहिती समोर येत आहे.

सोशल मीडियावर असतो रिंकूचा बोलबाला

‘सैराट’ सिनेमामुळे अभिनेत्री रिंकू राजगुरू हिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. पहिल्या सिनेमातून यश मिळाल्यानंतर रिंकू हिने कधीही मागे वळून पाहिलं नाही. सोशल मीडियावर देखील रिंकू कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

चाहते देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून रिंकूची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असतात. रिंकू कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्ट लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

रिंकू राजगुरु हिचे सिनेमे

नुकताच रिंकू ‘झिम्मा 2’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली होती. चाहत्यांना देखील सिनेमातील रिंकूची भूमिका प्रचंड आवडली. रिंकूने मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. मेकअप, झुंड सिनेमात देखील अभिनेत्री दिसली. चाहते कायम रिंकूच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत असतात.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.