Rinku Rajguru | रिंकू राजगुरुला कोण देतंय त्रास? व्हिडीओ पाहून व्हाल हैराण
रिंकू राजगुरू तिच्या सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. नवनवीन फोटोशूटच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत असते. पण सध्य रिंकू राजगुरूला कोणीतरी त्रास देतय. रिंकूने स्वत: हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तीच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबई : सैराट चित्रपटातून एण्ट्री करत रसिक प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप पाडणारी आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर कहर करतेय. रिंकू राजगुरू तिच्या सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. नवनवीन फोटोशूटच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत असते. पण सध्य रिंकू राजगुरूला कोणीतरी त्रास देतय. रिंकूने स्वत: हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नक्की काय आहे त्या व्हिडीओत ?
या व्हिडीओमध्ये रिंकू योगा करताना दिसत आहे. परंतू योगा करताना एक मांजरीचे पिल्लू तिला त्रास देत आहे. ती करत असलेल्या योगासनांमध्ये ते छोटे मांजरीचे पिल्लू आडवं येत आहे. हा व्हिडीओ शेअर करत रिंकूने “रविवार ? जेव्हा आपण खूप प्लान करतो पण त्यातील काहीच घडत नाही. ??♀️? असे लिहत तिने त्यासोबत दोन इमोजीसुद्धा शेअर केल्या आहेत. त्यासोबतच #sundaymorningview? असा हॅशटॅगसुद्धा दिला आहे. त्यासोबतच Rinku Mahadeo Rajguru #iamrinkurajguru #SairatGallery #RinkuRajguruGallery #SairatGalleryFansClub हे हॅशटॅगसुद्धा दिले आहेत.
चाहत्यांचा प्रतिसाद
हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. या व्हिडीओला आत्ता पर्यात 37 हजारापर्यत लोकांनी पाहीला आहे. तर या व्हिडीओवर लाईक्सचा पाऊस पडत आहे. एका फेसबुक यूजरने तिच्या या व्हिडीओला ” लव यू , माझ्याशी लग्न कर ” म्हणत तिला प्रपोज केले आहे. तर दुसऱ्या यूजरने सुंदर अशी कमेंट केली आहे.
आगामी चित्रपट
रिंकूनं सैराटनंतर ‘कागर’, ‘मेकअप’, ‘अनपॉज’ अशा अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. या सगळ्याच भूमिकांना प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता.आता 2021 मध्ये रिंकु एका ‘झुंड’ या चित्रपटात झळकणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटात आर्चीसोबत तिचा परशा सुद्धा झळकणार आहे. अभिनेते अमिताभ बच्चन हे सुद्धा या चित्रपटा महत्त्वाच्या भूमिकेत झळकतील. त्यामुळे रिंकूसाठी हा चित्रपट प्रचंड महत्त्वाचा ठरणार आहे.
इतर बातम्या :
पान मसाला ब्रँडपासून अमिताभ बच्चन यांची फारकत, मानधनाचे पैसे परत करत रद्द केला जाहिरात करार!
‘स्वाभिमान’ मालिकेत रंगणार क्रिकेटचा सामना, पल्लवी करणार फलंदाजी तर शंतून दिसणार पंचाच्या भूमिकेत!
Palmistry : तळहातावरील तीळ काय सांगतो? जाणून घ्या शुभ-अशुभ संकेतhttps://t.co/NiXDdEpjAM#Palmistry #PalmMole #Spiritual
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 11, 2021