Rishabh Pant: ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत उर्वशीच्या आईने व्यक्त केली चिंता; युजर्स म्हणाले..

ऋषभ पंतच्या अपघातानंतर उर्वशी रौतेलाच्या आईची पोस्ट व्हायरल; 'सोशल मीडियावरील अफवा एका बाजूला आणि..'

Rishabh Pant: ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत उर्वशीच्या आईने व्यक्त केली चिंता; युजर्स म्हणाले..
Rishabh Pant: ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत उर्वशीच्या आईने व्यक्त केली चिंताImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jan 03, 2023 | 9:17 AM

देहरादून: अपघातानंतर क्रिकेटर ऋषभ पंतच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. देहरादूनमधील रुग्णालयात दाखल असलेल्या ऋषभला आता आयसीयूमधून दुसऱ्या वॉर्डमध्ये हलविण्यात आलं आहे. देशभरातील चाहते त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत. अशातच अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या आईची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऋषभचा फोटो पोस्ट करत उर्वशीच्या आईने ही पोस्ट लिहिली आहे.

उर्वशीची आई मीरा रौतेला या सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. ऋषभच्या अपघाताचं वृत्त कळताच त्यांनी इन्स्टाग्रामवर त्याचा एक फोटो शेअर केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘सोशल मीडियावरील अफवा एका बाजूला आणि तू स्वस्थ होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तराखंडचं नावलौकीक करणं दुसऱ्या बाजूला. सिद्धबलिबाबांची तुझ्यावर विशेष कृपा असू दे. तुम्ही सर्वजणसुद्धा प्रार्थना करा.’

हे सुद्धा वाचा

मीरा यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत ऋषभच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. तर काहींनी उर्वशी आणि ऋषभच्या नात्यावरूनही कमेंट केली. ‘सासूंचा आशीर्वाद नेहमीच कामी येतो’, अशी विनोदी कमेंट एका युजरने लिहिली. तर ‘जावई लवकरच ठीक होईल, काळजी करू नका’, असं दुसऱ्याने मस्करीत लिहिलंय.

उर्वशी आणि ऋषभ पंतचा वाद जगजाहीर आहे. उर्वशीने एका मुलाखतीत आरपीचा (RP) उल्लेख केला होता. तो आरपी ऋषभ पंतच असावा, असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला. त्यानंतर सोशल मीडियावर ऋषभ आणि उर्वशी यांच्यात अप्रत्यक्षपणे वाद झाला.

ऋषभच्या अपघातानंतर उर्वशीचीही पोस्ट चर्चेत होती. उर्वशीने तिच्या फोटोशूटचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. मात्र नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यानंतर तिने कॅप्शनमध्ये लिहिलं ‘प्रार्थना करतेय’. उर्वशीने ऋषभसाठीच हे कॅप्शन लिहिलं असावं, असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला.

'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.