Kantara: बॉक्स ऑफिसवर ‘कांतारा’चा धुमाकूळ; KGF ला टाकलं मागे

'कांतारा'ची क्रेझ कायम; कमावले इतके कोटी रुपये

Kantara: बॉक्स ऑफिसवर 'कांतारा'चा धुमाकूळ; KGF ला टाकलं मागे
कांतारा चित्रपटImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 25, 2022 | 4:28 PM

मुंबई- तुम्ही सिनेप्रेमी असाल तर आतापर्यंत ‘कांतारा’ (Kantara) या चित्रपटाचं नाव नक्कीच ऐकलं असणार. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या कन्नड चित्रपटाची (Kannada Movie) जोरदार चर्चा आहे. ज्यांनी हा चित्रपट पाहिला आहे, ते याविषयी सोशल मीडियावर त्याचं कौतुक करत आहेत. तर ज्यांनी हा चित्रपट अद्याप पाहिला नाही, त्यांना त्याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. नुकतेच या चित्रपटाने कमाईचे नवे विक्रमही रचले आहेत.

चित्रपट व्यापार विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार, कांताराने बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत सुपरस्टार यशच्या ‘केजीएफ- चाप्टर 1’ या चित्रपटालाही मागे टाकलं आहे. त्यामुळे कन्नड चित्रपटसृष्टीतील ही केजीएफ- चाप्टर 2 नंतरचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

हे सुद्धा वाचा

दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे कांताराच्या कमाईत चांगलीच वाढ होताना दिसतेय. या चित्रपटाने आतापर्यंत 170 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. पिंकविला या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, चौथा आठवडा संपण्याआधी हा चित्रपट 200 कोटींचा टप्पा पार करेल असा अंदाज आहे.

कांताराने कर्नाटकमध्ये आतापर्यंत जवळपास 111 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यापैकी 14 कोटी रुपयांची कमाई ही चौथ्या आठवड्यातील आहे. यशच्या केजीएफच्या पूर्ण चार आठवड्यांच्या कमाईपेक्षा हा आकडा दुप्पट आहे. तर केजीएफ- चाप्टर 2 हा चित्रपट अद्याप सर्वाधिक कमाई करणाऱ्या कन्नड चित्रपटांच्या यादीत पहिल्या स्थानीच आहे.

कांतारा हा चित्रपट 14 ऑक्टोबर रोजी हिंदी भाषेत प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर तमिळ आणि तेलुगू भाषेत हा चित्रपट 15 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. तर मल्याळम भाषेतील चित्रपट 20 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. कन्नडशिवाय इतर भाषांमध्येही कांताराला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय.

कांतारा या चित्रपटाची कथा रुढी-परंपरा, लपलेला खजाना आणि पिढ्यांपासून असलेल्या रहस्यावर आधारित आहे. ऋषभ शेट्टीने या चित्रपटा मुख्य भूमिका साकारली असून त्यानेच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.