इतकी अफाट लोकप्रियता, भारतातील ‘या’ चित्रपटात काम करण्यासाठी 25 हजार लोकांचे अर्ज

लोक नोकरी मिळवण्यासाठी लाखोने अर्ज करतात. सध्या एका चित्रपटाच्या बाबतीत हे घडतय. एका चित्रपटात काम करण्यासाठी तब्बल 25 हजार लोकांनी अर्ज केलाय. हे भाग्य फार कमी चित्रपटांच्या वाट्याला येतं. लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

इतकी अफाट लोकप्रियता, भारतातील 'या' चित्रपटात काम करण्यासाठी 25 हजार लोकांचे अर्ज
movie
Follow us
| Updated on: Dec 22, 2023 | 4:43 PM

नवी दिल्ली : बातमीच हेडींग वाचून तुमच्या मनात काही प्रश्न निर्माण होतील. हा कुठल्या नोकरीचा विषय नाहीय, तर आम्ही चित्रपटाबद्दल बोलतोय. लोक नोकरीसाठी लाखोने अर्ज करतात. सध्या एका चित्रपटाच्या बाबतीत हे घडतय. एका लोकप्रिय चित्रपटात काम करण्यासाठी तब्बल 25 हजार लोकांनी अर्ज केले आहेत. महत्त्वाच म्हणजे हा प्रादेशिक चित्रपट होता. पण नंतर तो बहुभाषिक झाला. देशभरात तुफान हिट ठरला. आता याच चित्रपटात संधी मिळावी, म्हणून अनेकांमध्ये स्पर्धा आहे. आम्ही बोलतोय ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ चित्रपटाबद्दल. ‘कांतारा’ चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. कमी बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली. हा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता.

आता कांताराचा पुढचा भाग ‘कांतारा 2′ बद्दल लोकांमध्ये प्रचंड एक्साइटमेंट आहे. अलीकडेच होम्बले फिल्म्सने चित्रपटाच्या स्टारकास्ट सिलेक्शनसाठी अर्ज करण्याची संधी दिली होती. त्याला तुफान प्रतिसाद मिळाला. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, कांतारा 2 च्या स्टारकास्टचा भाग होण्यासाठी तब्बल 25 हजार लोकांनी अर्ज केलाय. ‘कांतारा’ चित्रपट प्रेक्षकांमध्ये किती लोकप्रिय आहे, याच हे एक उत्तम उदहारण आहे. आता 25 हजारपैकी किती लोकांना संधी मिळणार? हे लवकरच ठरेल.

स्टारकास्टचा भाग होण्यासाठी अट काय?

कलाकार पाहिजे म्हणून होम्बले फिल्म्सने एक पोस्ट शेअर केली होती. पुरुष कलाकारांच वय 30 ते 60 वर्षा दरम्यान पाहिजे अशी अट होती. महिला कलाकारासाठी वयाची अट 18 ते 60 होती. kantasara.film वेबसाइटवर जाऊन नाव रजिस्टर कराव लागणार होतं. 14 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची संधी होती. आतापर्यंत 25 हजार अर्ज आले आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.