VIRAL : 43 वर्षांपूर्वी कशी असायची लग्न पत्रिका? ऋषी कपूर – नीतू कपूर यांची पत्रिका पाहून म्हणाल…

VIRAL : प्रचंड खास आहे ऋषी कपूर - नीतू कपूर यांच्या लग्नाची पत्रिका... व्हायरल फोटो पाहून तुम्ही देखील म्हणाल... 43 वर्षांपूर्वी कशी असायची लग्न पत्रिका... कसा असायचा उत्साह... ऋषी कपूर - नीतू कपूर यांच्या लग्नाची पत्रिका पाहिल्यानंतर अनेकांना आठवतील जुने दिवस

VIRAL : 43 वर्षांपूर्वी कशी असायची लग्न पत्रिका? ऋषी कपूर - नीतू कपूर यांची पत्रिका पाहून म्हणाल...
Follow us
| Updated on: Dec 22, 2023 | 11:26 AM

मुंबई | 22 डिसेंबर 2023 : लग्न प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. लग्न म्हटलं की शॉपिंग, तयारी, पाहुणे इत्यादी गोष्टींचा गोंधळ उडतो. पण सर्वात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे लग्न पत्रिका… आता 43 वर्ष जुनी लग्न पत्रिका सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेली लग्न पत्रिका कोणा दुसऱ्याची नसून दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि अभिनेत्री नीतू कपूर यांची आहे. सोशल मीडियावर ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या लग्नाची पत्रिका तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर, चाहते देखील दोघांच्या लग्नाच्या पत्रिकेवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

सांगायचं झालं तर, लग्नाच्या रिसेप्शनसाठी पाहुण्यांना आमंत्रित करण्यासाठी छापलेली पत्रिका सामान्य कार्डासारखीच आहे. पण पत्रिकेवर असलेली नावे प्रचंड खास आहेत. पत्रिकेच्या वरच्या बाजूला आर.के. स्टुडिओच्या आयकॉन्स आणि आमंत्रितांमध्ये पृथ्वीराज कपूर, राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर, प्रेमनाथ आणि रणधीर कपूर यांसारख्या दिग्गजांची नावे आहेत.

ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांचा रिसेप्शन सोहळी आरके स्टूडियो परिसरात संपन्न झाला होता. या रिसेप्शन सोहळ्यासाठी बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या लग्नाच्या पत्रिकेची चर्चा रंगली आहे.

व्हायरल पोस्टवर चाहत्यांची प्रतिक्रिया

ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या लग्नाची पत्रिका पाहून चाहते लाईक्स आणि कमेंट करत आहेत. एक नेटकरी करीना कपूर आणि करिश्मा कपूर यांचा उल्लेख करत म्हणाला, ‘आमच्या काकाच्या लग्नाला नक्की यायचं हा…’ तर काही नेटकऱ्यांनी ‘ॲनिमल’ सिनेमातील काही सीन पोस्ट केले आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘यू ट्रेन्ड मी वेल, पापा’

ऋषी कपूर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, ते आज जगात नसले तरी, त्यांच्या बद्दल कायम चर्चा रंगत असतात. एवढंच नाहीतर, त्यांचे सिनेमे देखील चाहते तितक्याच आवडणीने पाहातात. ऋषी कपूर यांचं निधन 29 एप्रिल 2020 मध्ये झालं. त्यांच्या निधनानंतर चाहते आणि सेलिब्रिटींना फार मोठा धक्का बसला होता. ऋषी कपूर यांच्या अनेक आठवणी आजही चाहत्यांच्या मनात कायम आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.