मी मरेल तेव्हा कोणी खांदा द्यायला…, ऋषी कपूर रागात जे बोलले मृत्यूसमयी तसंच झालं
शब्दांमध्ये खूप असते ताकद... ऋषी कपूर यांच्या तोंडून रागात निघालेले शब्द ठरले खरे, त्यांच्या अंत्यसंस्करासाठी कोणीच नाही पोहोचलं, 'मी मरेल तेव्हा कोणी खांदा द्यायला...' असं का म्हणाले होते ऋषी कपूर? सध्या सर्वत्र ऋषी कपूर यांनी केलेल्या 'त्या' तीन ट्विटची चर्चा...
बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाला चार वर्ष पूर्ण झाले आहेत. पण त्यांच्या अनेक आठवणी आजही चाहत्यांच्या मनात कायम आहे. कर्करोगामुळे ऋषी कपूर यांचं निधन झालं आणि सिनेविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली. कोरोना काळात ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतल्यामुळे त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी इच्छा असून देखील सेलिब्रिटींना येता आलं आहे. त्यामागे कारण होतं लॉकडाऊन… सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमा साहनी देखील वडिलांच्या अंत्यसंस्काराला पोहचू शकली नाही. ऋषी कपूर यांच्याबद्दल एक गोष्ट फार कमी लोकांना माहिती असेल एकदा ऋषी कपूर रागात असं काही बोलून गेले की, त्यांचे ते शब्द त्यांच्या मृत्यूसमयी खरे ठरले…
मझ्या अंत्यसंस्काराला कोणीही यायचं नाही… कोणीही मला खांदा द्यायचा नाही… असं वक्तव्य ऋषी कपूर यांनी रागात केलं होतं. त्यामागे कारण देखील तितकंच मोठं होतं. अभिनेते विनोद खन्ना यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी फार कमी सेलिब्रिटी पोहोचले होते. यावर नाराजी व्यक्त करत ऋषी कपूर असं काही म्हणले जे सत्य झालं. ट्विट करत ऋषी कपूर यांनी नाराजी व्यक्त केली होती.
Shameful. Not ONE actor of this generation attended Vinod Khanna’s funeral. And that too he has worked with them. Must learn to respect.
— Rishi Kapoor (@chintskap) April 27, 2017
पहिल्या ट्विटमध्ये ऋषी कपूर म्हणाले, ‘लाजिरवाणं… या जेनरेशनचा एकही अभिनेता विनोद खन्ना यांच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचला नव्हता… ज्यांनी विनोद खन्ना यांच्यासोबत काम केलं ते सुद्धा नव्हते… आदर करायला शिका…’ असं म्हणत ऋषी कपूर यांनी नाराजी व्यक्त केली होती.
Why this? Including mine and thereafter.When I die, I must be prepared.None will shoulder me. Very very angry with today’s so called stars.
— Rishi Kapoor (@chintskap) April 27, 2017
दुसऱ्या ट्विटमध्ये ऋषी कपूर म्हणाले, ‘मला एका गोष्टीसाठी कायम तयार राहायला हवं. मला खांदा देण्यासाठी कोणीही येणार नाही… आजचे सो कॉल्ड स्टार… मी खूप नाराज आहे… अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या पार्टीमध्ये सेलिब्रिटी पोहोचले. पण अंत्यसंस्काराकडे पाठ फिवरली… ऋषी कपूर यांनी रागात बोलले शब्द त्यांच्या मृत्यूसमयी खरे ठरले.
Angry. Met so many chamcha people last night at Priyanka Chopra’s do last night. Few at Vinod’s. So fuckn transparent. So angry with them.
— Rishi Kapoor (@chintskap) April 27, 2017
सांगायचं झालं तर, तीन वर्षांनंतर ऋषी कपूर यांचं निधन झाले. पण त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी इच्छा असून देखील सेलिब्रिटी येऊ शकले नाहीत. फक्त 20 लोकं ऋषी कपूर यांना अखेरचा निरोप देऊ शकले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी रणबीर कपूर, नीतू कपूर यांच्यासोबत आलिया भट्ट, करीना कपूर, करिश्मा कपूर, रणधीर कपूर, बबीता कपूर, सैफ अली खान उपस्थित होते.