करिश्मा कपूरच्या पहिल्याच चित्रपटावरून ऋषी कपूर संतापले; काका-पुतणीत का झाले होते वाद?
करिश्मा कपूरच्या पहिल्याच चित्रपटावेळी तिचे काका ऋषी कपूर नाराज झाले होते. यावर करिश्माने देखील तिचे मत स्पष्ट केले होते. तिच्या पहिल्याच चित्रपटावरून करिश्मा आणि तिचे काका ऋषी कपूर यांच्यात मतभेद झाले होते. एवढंच नाही तर या चित्रपटाचा अभिनेताही करिश्मावर नाराज होता.

बॉलिवूडमध्ये अशी बरीच घराणे आहेत ज्यांच्याकडे चित्रपटांची परंपरा 70s,80s पासून सुरु आहे. त्यात खान असतील, बच्चन कुटुंब असेल किंवा मग कपूर कुटुंब असेल. या आणि यांसारख्या अनेक कुटुंबाचे हिंदी चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान आहे. त्यात कपूर कुटुंबाचं नाव नक्कीच पहिलं येतं. मात्र, जेव्हा कुटुंबातील मुली आणि सुनांसाठी काम करण्याची वेळ येते, तेव्हा हे कुटुंब थोडे मागे राहतं. कारण असे म्हटले जाते लग्नाआधी तुम्ही कितीही मोठ्या अभिनेत्री असो पण लग्नानंतर त्यांना त्यांचं फिल्मी करिअर सोडावंच लागायचं. कपूर घराण्यातील महिला काम करत नाहीत अशी समजूत होती. मात्र करिश्मा कपूरने या समजुतीला छेद देत चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं आणि ती आपल्या काळातील एक उत्तम अभिनेत्री ठरली. तिची क्रेझ आजही तेवढीच आहे. तिची आई बबिताने तिला या अभिनय क्षेत्रात येण्यासाठी खूप पाठिंबा दिला. मात्र कपूर कुटुंबाची परंपरा पाहाता करिश्माचा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता.
चित्रपटातील एक सीन ऋषी कपूर संतापले
करिश्मा कपूरने 90 च्या दशकात ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून आपली करियरची सुरुवात केली. तिच्या या पहिल्या चित्रपटाकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या होत्या. पहिल्याच चित्रपटातून करिश्माच्या तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. सर्वांनी तिचं कौतुक केलं. पण, चित्रपट पाहिल्यानंतर तिचे काका ऋषी कपूर मात्र चांगलेच संतापले होते. कारण करिश्माने या चित्रपटात स्विमसूट घालून एक सीन केला होता. पण करिश्माला त्यांची ही भूमिका खूप चुकीची वाटली होती आणि तिने त्यावर त्यांना प्रत्युत्तरही दिले होते.
लोकं माझ्या अभिनयाबद्दलच बोलत होते स्विमसूटबद्दल नाही….
काही काळानंतर करिश्माने एका मुलाखतीत याबद्दल अगदी स्पष्टपणाने आपलं मत मांडलं होतं. मुलाखतीत तिला हा प्रश्न विचारला गेला की ‘तुझ्या काकांना तू स्विमसूट घालणे आवडले नव्हते, त्यांना वाटत होते की पहिल्या चित्रपटात असा पोशाख योग्य नाही’, करिश्माने मोठ्या आत्मविश्वासाने यावर उत्तर दिले होते, ती म्हणाली की जेव्हा लोक ‘प्रेम कैदी’ पाहून थिएटरमधून बाहेर येत होते तेव्हा ते माझ्या अभिनयाबद्दलच बोलत होते, स्विमसूटच्या पोशाखाबद्दल कोणीही चर्चाच केली नाही. तिच्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिचे पालक काय विचार करतात, त्यांना कसे वाटते, हेच तिला महत्त्वाचे होते.
ऋषी कपूरच्या नाराजीवर करिश्माचे मत
ऋषी कपूरच्या नाराजीवर करिश्माने असे मत मांडले होते की तिच्या पालकांना काहीच अडचण नाही तर इतरांनी का अडचण मानावी? करिश्माने म्हटले की स्विमसूटमध्ये काही गैर नाही, इतर किशोरवयीन मुलीही ते घालतातच ना! या पहिल्याच चित्रपटानंतर करिश्मा आणि तिचे काका तथा अभिनेते ऋषी कपूर यांच्यात मतभेद झाले होते.
चित्रपटाचा अभिनेताही होता नाराज
‘प्रेम कैदी’च्या यशानंतर करिश्मा कपूरने तिच्या सहकलाकार हरीश कुमारवरही प्रतिक्रिया दिली होती. हरीशला वाटले होते की सगळे श्रेय करिश्माला मिळाले आहे. करिश्माने स्पष्ट केले की चित्रपटाचे निर्माता श्री. डी. रामा नायडू यांनी स्वतः सांगितले होते की प्रेम कैदीचे नायक आणि नायिका करिश्मा कपूर आहे. प्रेम कैदी संपूर्ण टीमच्या मेहनतीचे फळ होते. हरीश नाराज का आहे हे तिला कळत नव्हतं. करिश्माने ठामपणे सांगितले की प्रेम कैदी तिच्यामुळे हिट झाला.
‘प्रेम कैदी’ हा चित्रपट 1991 मध्ये प्रदर्शित झाला. के. मुरली मोहन्नाने दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात करिश्मा कपूर, हरीश कुमार, दिलीप ताहिल आणि परेश रावल मुख्य भूमिकेत होते. प्रेम, नाते आणि एक मुलगी व तिच्या वडिलांच्या नात्यावर आधारित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.