रशियन मुलींचं आमिष देत ऋषी कपूर यांनी मित्राला सेटवर बोलावलं, त्यानंतर…, इतक्या वर्षांनंतर मोठं सत्य समोर
Russian Girls: ऋषी कपूर यांनी मित्राला रशियन मुलींचं आमिषे देत सेटवर बोलावलं, त्यानंतर मित्राच्या आयुष्यात झाले अनेक बदल.... इतक्या वर्षांनंतर इंडस्ट्रीतील मोठं सत्य समोर..., झगमगत्या विश्वातील नव्या गोष्टी कायम येत असतात चाहत्यां समोर...
बॉलिवूडचे अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे. पण त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याच्या चर्चा कायम रंगलेल्या असतात. आता दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्याबद्दल मोठं सत्य समोर येत आहे. ऋषी कपूर यांचे मित्र रवैल यांनी एक सत्य सांगितलं आहे. फिल्ममेकर राहुल रवैल यांना कॅनडा याठिकाणी जावून न्यूक्लियर फिजिक्स विषयात शिक्षण घ्यायचं होतं. दरम्यान, ऋषी कपूर यांनी राहुल यांना आमिष देत ‘मेरा नाव जोकर’ सिनेमाच्या सेटवर बोलावलं. त्यानंतर राहुल याचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. ऋषी कपूर राहुल यांना म्हणाले, ‘सेटवर सुंदर रशियन मुली आल्या आहेत… रशियन मुलींचं आमिष दिल्यानंतर राहुल रवैल सेटवर पोहोचले आणि इंडस्ट्रीचे झाले.
राहुल रवैल म्हणाले, ‘मी वयाच्या 15 व्या वर्षापासून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत करण्यास सुरुवात केली. माझे वडील देखील फिल्ममेकर होते. घरात देखील माझ्या तसं वातावरण होतं. पण मी कधीच लक्ष दिलं नाही. मला न्युक्लियर फिजिक्समध्ये शिक्षण घ्यायचं होतं. कॅनडात जायची देखील माझी तयारी झाली होती. परीक्षा संपल्यानंतर मित्र ऋषी यांचा मला फोन आला.’
‘ऋषी यांचे वडील (राज कपूर) यांनी ‘मेरा नाम जोकर’ सिनेमाता पुढचा पार्ट शुट करण्याची सुरुवात केली होती. रशियन सर्कसचा पार्ट होता. सेटवर अनेक सुंदर रशियन मुली होत्या. त्यांनी शॉर्ट स्कर्ट घातले होते. त्यामुळे मी देखील सेटवर जाण्यास सुरुवात केली. सेटवर पोहोचल्यानंतर मी कायम राज सरांचं काम पाहायचो… एकटा माणूस 5 हजार लोकांची टीम सांभाळत होता…’
‘राज कपूर यांची छोट्या – छोट्या गोष्टींवर करडी नजर असायची… मी त्यांनी पूर्ण दिवस पाहात राहायचो… दुसऱ्या दिवशी मी सेटवर पोहोचलो तेव्हा सेटवर रशियन मुली नव्हत्या. मला देखील शिक्षणासाठी कॅनडाला जायचं होतं. पण त्यासाठी काही महिने बाकी होते. अशात मी राज कपूर यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला…’
राहुल रवैल पुढे म्हणाले, ‘मला राज कपूर यांच्यासोबत काम करायचं होतं म्हणून माझ्या वडिलांनी त्यांना सांगितलं. यावर तेव्हा राज कपूर म्हणाले होते, त्यांना जेथे जायचं आहे जावूदे पण एकदा या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर, इंडस्ट्री सोडणं फार कठीण आहे आणि तेच झालं…’ ‘मेरा नाम जोकर’ सिनेमानंतर राहुल रवैल इंडस्ट्रीचे झाले…