लहान मुलांना तरी सोडा.. पापाराझींवर का चिडला रितेश देशमुख?

अभिनेता रितेश देशमुखचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. यामध्ये तो पापाराझींवर वैतागताना दिसून येत आहे. लहान मुलांना तरी सोडा, असं तो फोटोग्राफर्सना सांगतो. मात्र त्यानंतर तो फोटोसाठी पोझसुद्धा देतो. रितेशचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

लहान मुलांना तरी सोडा.. पापाराझींवर का चिडला रितेश देशमुख?
Riteish Deshmukh with kidsImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 15, 2024 | 1:20 PM

मुंबई : 15 जानेवारी 2024 | गेल्या काही वर्षात बॉलिवूडमध्ये पापाराझी कल्चर बरंच वाढल्याचं पहायला मिळालं. जिम असो किंवा एखाद्या रेस्टॉरंटमधील डेट.. सेलिब्रिटींच्या मागोमाग हे पापाराझी तिथे पोहोचतात. सेलिब्रिटींना या पापाराझींची सवय झाली असली तरी अनेकदा कॅमेरासमोर ते वैतागल्याचं स्पष्ट दिसून येतं. असंच काहीसं अभिनेता रितेश देशमुखसोबत घडलंय. रितेशचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये रितेशसुद्धा पापाराझींवर वैतागलेला दिसून येत आहे. मात्र थोड्या वेळानंतर तो पत्नी जिनिलिया देशमुखसोबत त्यांच्यासमोर फोटोसाठी पोझ देतो.

रितेश आणि जिनिलिया हे त्यांच्या मुलांच्या फुटबॉल गेमसाठी ग्राऊंडवर पोहोचले होते. त्याठिकाणीही पापाराझींनी त्यांचा पाठलाग केला. तेव्हा पापाराझींसमोरच रितेश वैतागून म्हणाला, “मुलांच्या फुटबॉलमध्ये कुठे येताय तुम्ही? लहान मुलांना तरी सोडा.” त्यानंतर तो जिनिलियासोबत फोटोसाठी पोझसुद्धा देतो. रितेश आणि जिनिलिया ही बॉलिवूडमधील सर्वांत आदर्श जोडी मानली जाते. या दोघांना एकत्र पाहून चाहतेसुद्धा खुश होतात. इतकंच नव्हे तर त्यांनी दोन्ही मुलांनाही पापाराझींसमोर कसं वागावं याबद्दलची शिकवण दिली आहे. म्हणूनच रितेश आणि जिनिलियाची मुलं जेव्हा कधी पापाराझी किंवा फोटोग्राफर्ससमोर येतात, तेव्हा ते हात जोडून नमस्कार करताना दिसतात.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

जिनिलिया आणि रितेशने 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या दोन वर्षांनंतर जिनिलियाने रियानला जन्म दिला. त्यानंतर 2016 मध्ये जिनिलिया आणि रितेश यांना दुसरा मुलगा झाला. त्याचं नाव राहील असं आहे. जिनिलियाने मध्यंतरीच्या काळात ‘जय हो’ आणि ‘फोर्स 2’मध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिका साकारल्या होत्या. मात्र 2012 मधील ‘ना इष्टम’ या तेलुगू चित्रपटानंतर ‘वेड’ या मराठी चित्रपटामध्येच तिने मुख्य भूमिका साकारली. कुटुंबाकडे अधिक लक्ष देता यावं यासाठी ग्लॅमर विश्वातून ब्रेक घेतल्याचं तिने याआधीच्या एका मुलाखतीतही स्पष्ट केलं होतं.

इंडस्ट्रीत पुन्हा काम करताना कोणत्याही ठराविक बॅनरचा विचार करत नसल्याचंही जिनिलियाने एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. एखादी कथा तिला खरंच आवडली आणि त्यात मनापासून काम करण्याची इच्छा निर्माण झाली तर तो प्रोजेक्ट आवडीने स्वीकारेन, असंही ती म्हणाली होती.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.