Ranveer Singh | ‘करण जोहर आणि मी असे पुरुष आहोत जे कायम…’, अभिनेत्याच्या वक्तव्याने सर्वत्र खळबळ

करण जोहर आणि रणवीर सिंग यांच्यामध्ये कसं आहे नातं? खुलासा करत खु्द्द अभिनेता म्हणाला, 'करण जोहर आणि मी असे पुरुष आहोत जे कायम...' सर्वत्र चर्चांना उधाण...

Ranveer Singh | 'करण जोहर आणि मी असे पुरुष आहोत जे कायम...', अभिनेत्याच्या वक्तव्याने सर्वत्र खळबळ
Follow us
| Updated on: Jul 19, 2023 | 2:35 PM

मुंबई | 19 जुलै 2023 : अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आगामी सिनेमा ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani) सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. सिनेमात प्रेक्षकांना आलिया – रणवीर यांची लव्हस्टोरी अनुभवता येणार आहे. सध्या सर्वत्र ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमाची चर्चा सुरु आहे. नुकताच सिनेमातील दोन गाणी प्रदर्शित करण्यात आली. ‘वे कमलिया’ गाण्याच्या लॉन्च दरम्यान रणवीर कपूर याने दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) याच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. लॉन्च दरम्यान, आलिया आणि रणवीर यांना करण जोहर याच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल विचारण्यात आलं.

करण जोहर याच्यासोबत असलेल्या नात्यावर आलिया म्हणाली, ‘करण आणि रणवीर कायम एकमेकांची प्रशंसा करत असतात. करण आणि मला प्रवाहासोबत जायला आवडतं. आम्ही सिनेमाच्या शुटिंग दरम्यान फक्त आणि फक्त मज्जा केली.’ सिनेमातील आलियाच्या भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री बंगाली पत्रकार राणी चॅटर्जीच्या भूमिकेतून चाहत्यांच्या भेटील येणार आहे.

तर करण जोहर याच्यासोबत असलेल्या नात्यावर रणवीर म्हणाला, ‘करण आणि मी असे पुरुष आहोत, ज्यांच्यामध्ये दिल्लीतील काकू लपलेली आहे. आम्हाला कपडे, वेगवेगळ्या ब्रॉन्ड्सबद्दल बोलायला प्रचंड आवडतं. करण एक उत्तम एंटरटेनर आहे. मला असं कधीच वाटलं नाही की सिनेमाच्या शुटिंगसाठी जात आहे. मित्राला भेटयला जात असल्याचं मला शुटिंगच्या प्रत्येक दिवशी जाणवलं…’ असं अभिनेता म्हणाला.

हे सुद्धा वाचा

सध्या सर्वत्र आलिया आणि रणबीर यांच्या आगामी सिनेमाची चर्चा रंगत आहे. सिनेमात आलिया, रणवीर यांच्यासोबत अभिनेते धर्मेंद्र, अभिनेत्री जया बच्चन, शबाना अजमी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमाचा ट्रेलर आणि दोन गाणी प्रदर्शित झाली आहेत.

सिनेमाची शुटिंग मुंबई, नवी दिल्ली, रूस आणि जम्मू-कश्मीर याठिकाणी झाली आहे. झोया अख्तर दिग्दर्शित ‘गली बॉय’ सिनेमानंतर दुसऱ्यांदा आलिया आणि रणवीर यांची केमिस्ट्री चाहत्यांना अनुभवता येणार आहे. हिरू यश जोहर, करण जोहर आणि अपूर्व मेहता निर्मित ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ २८ जुलै रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

सोशल मीडियावर देखील सिनेमाची चर्चा होत आहे. एवढंच नाही तर सिनेमाती आलिया हिने नेसलेल्या साड्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. आलिया देखील सिनेमाबद्दल महत्त्वाच्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोवत असते.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.