बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्करच्या रिलेशनशिपच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. ती लवकरच रोहनप्रीत सिंह यांच्यासोबत विवाह बंधनात अडकरणार आहे. यामध्ये नेहाने रोहनप्रीत सोबत तिचा एक खास फोटो शेअर केला आहे. ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
तुम्ही पाहू शकता फोटोमध्ये कशा प्रकारे रोहनप्रीतने नेहाला लग्नासाठी प्रपोज केलं आहे.
खरंतर या दोघांची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत.
हा फोटो नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
फोटोमध्ये दोघंही अगदी आनंदी आहेत. त्यामुळे असेच हसत राहा आणि एकत्र राहा अशा शुभेच्छा दोघांनाही चाहत्यांकडून देण्यात येत आहेत.
हा फोटो शेअर करताना नेहाने एक खास आणि रोमँटिक कॅप्शनही दिलं आहे.
'The day He proposed to Me!! @rohanpreetsingh Life is more beautiful with You ' असं नेहाने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, नेहा आणि रोहनप्रीतचं लग्न हे दिल्लीमध्ये होणार आहे. यासाठी नेहा गुरुवारी सकाळीच कुटुंबासोबत फ्लाइटने दिल्लीला पोहोचली. याचाही एक फोटो नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.