दोन वर्षांत एक हिट देऊन कोणी हिटमॅन बनत नाही; रोहित शर्माने उडवली आमिर खानची खिल्ली

| Updated on: Mar 26, 2023 | 11:51 AM

माधवन आमिरला पाठिंबा देत म्हणतो, "आमिरने त्याच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत." माधवनच्या या वक्तव्यावर रोहित आमिरची खिल्ली उडवत पुढे म्हणतो, "दोन वर्षांत एक हिट देऊन कोणी हिटमॅन बनत नाही."

दोन वर्षांत एक हिट देऊन कोणी हिटमॅन बनत नाही; रोहित शर्माने उडवली आमिर खानची खिल्ली
Aamir Khan and Rohit Sharma
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : ‘थ्री इडियट्स’ हा बॉलिवूडमधल्या अशा काही निवडक चित्रपटांपैकी एक आहे, ज्याने चाहत्यांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळालं. नुकत्याच एका व्हिडीओमध्ये आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी यांना पुन्हा एकत्र पाहून चाहते फार उत्सुक झाले होते. हे तिघे मिळून थ्री इडियट्सचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत का, असा प्रश्न अनेकांना पडला. मात्र हे तिघे चित्रपटासाठी नाही तर एका क्रिकेट ॲपला प्रमोट करण्यासाठी एकत्र आले होते.

या क्रिकेट ॲपचा नवीन प्रमोशनल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये आमिर, माधवन आणि शर्मन हे एका पत्रकार परिषदेत बोलत असल्याचं पहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये तिघे स्टार्स अशा क्रिकेटर्सची खिल्ली उडवताना दिसत आहेत, ज्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलंय. त्याचसोबत आता आपण क्रिकेटच्या मैदानात उतरणार असल्याचं ते जाहीर करतात.

हे सुद्धा वाचा

आमिर म्हणतो, “आम्ही विचार केला की हे लोक अभिनयात व्यस्त आहेत तर आम्हीच क्रिकेट खेळतो.” आमिरच्या या वक्तव्यावर अनेक प्रतिक्रियाही व्हिडीओत पहायला मिळतात. अनेकजण त्याच्या क्रिकेट खेळण्याच्या वक्तव्यावर हसतात आणि खिल्ली उडवतात.

पहा व्हिडीओ

आमिरच्या क्रिकेट खेळण्याच्या वक्तव्यावर रोहित शर्मा म्हणतो, “लगान चित्रपटात क्रिकेट खेळून कोणी क्रिकेटर बनत नाही.” त्यावर माधवन आमिरला पाठिंबा देत म्हणतो, “आमिरने त्याच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत.” माधवनच्या या वक्तव्यावर रोहित आमिरची खिल्ली उडवत पुढे म्हणतो, “दोन वर्षांत एक हिट देऊन कोणी हिटमॅन बनत नाही.”

क्रिकेट विश्वात येणं अभिनेत्यांसाठी खूपच आव्हानात्मक असल्याचं काहीजण या व्हिडीओत म्हणतात. हार्दिक पांड्या म्हणतो, “एक बाऊन्सर आला, तर जमिनीवर याल.” तर जसप्रीत बुमराह अभिनेत्यांच्या खेळीवर प्रश्न उपस्थित करत विचारतो, “ते फिल्डवर 150 धावा तरी करू शकतील का?” ‘जो जीता वो सिकंदर, जो हारा वो बंदर’ असं म्हणत अभिनेतेसुद्धा क्रिकेटर्सना खुलं आव्हान देतात.

हा व्हिडीओ एका ॲपच्या प्रमोशनचा असला तरी क्रिकेटर्स आणि अभिनेते यांच्यातील ही जुगलबंदी चाहत्यांना खूप आवडली. त्याचसोबत हे कलाकार खरंच क्रिकेटच्या मैदानावर उतरणार आहेत का, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.