Cirkus Trailer: ‘सर्कस’च्या ट्रेलरमध्ये मोठा ट्विस्ट; शेवटच्या दहा सेकंदात दडलाय सरप्राइज!

आला रे आला, रणवीरच्या 'सर्कस'चा ट्रेलर आला; डबल रोलमध्ये करणार डबल मनोरंजन

Cirkus Trailer: 'सर्कस'च्या ट्रेलरमध्ये मोठा ट्विस्ट; शेवटच्या दहा सेकंदात दडलाय सरप्राइज!
Cirkus TrailerImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Dec 02, 2022 | 2:17 PM

मुंबई: रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’ या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये अभिनेता रणवीर सिंगची दुहेरी भूमिका आहे. करिअरमध्ये पहिल्यांदाच रणवीर डबल रोल साकारतोय. जवळपास साडेतीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये कॉमेडी, ॲक्शन आणि ड्रामाचा भरणा पहायला मिळतोय. 60 च्या दशकातील कथा यामध्ये दाखवण्यात आली आहे. रणवीर सिंगसोबतच यामध्ये पूजा हेगडे आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या मुख्य भूमिका आहेत. या ट्रेलरच्या शेवटच्या दहा सेकंदांमध्ये प्रेक्षकांसाठी खास सरप्राइज आहे.

कॉमेडी आणि मजेशीर पंचेस यांनी परिपूर्ण असा सर्कसचा ट्रेलर ‘फुल्ल ऑन एंटरटेन्मेंट’ आहे. रणवीरने यामध्ये इलेक्ट्रीक मॅनची भूमिका साकारली आहे. ट्रेलरमधील कलरफूल सेट विशेष लक्ष वेधून घेतात. यात प्रेक्षकांसाठी असलेला खास सरप्राइज म्हणजे अभिनेत्री दीपिका पदुकोण. ट्रेलरच्या अखेरीस दीपिकाची दमदारी एण्ट्री पहायला मिळते.

रणवीर-दीपिकाचा आयटम साँग या चित्रपटात पहायला मिळणार आहे. याशिवाय ट्रेलरच्या शेवटी गोपाल, लक्ष्मण, माधव आणि लक्ष्मण (ॲई) ही गोलमालमधली नावं ऐकून चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढते. या दोन्ही गोष्टी अनपेक्षित असल्याची प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या ट्रेलरवर दिली आहे.

हे सुद्धा वाचा

या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस, पूजा हेगडे, वरुण शर्मा, विजय पाटकर, सुलभा आर्या, टिकू तलसानिया, वृजेश हिरजी, अश्विनी काळसेकर, सिद्धार्थ जाधव, जॉनी लिव्हर आणि मुरली शर्मा यांच्याही भूमिका आहेत. या वर्षाच्या अखेरीस 23 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

दिग्दर्शक रोहित शेट्टी हा बॉलिवूडमधील मसालापटांसाठी विशेष ओळखला जातो. कॉमेडी, ॲक्शन, ड्रामा या सर्वांचा सुरेख मेळ त्याच्या चित्रपटात पहायला मिळतो. म्हणूनच त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरतात आणि त्यांची कमाईही चांगली होते. त्यामुळे सर्कस हा चित्रपटसुद्धा या वर्षाचा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरेल, असा विश्वास चाहत्यांकडून व्यक्त होत आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.