‘सिंघम अगेन’मध्ये दीपिका पदुकोण बनणार लेडी सिंघम; रोहित शेट्टीची मोठी घोषणा

दीपिका पदुकोण साकारणार लेडी सिंघम; अजय देवगणसोबत मिळून शत्रूंशी लढणार

'सिंघम अगेन'मध्ये दीपिका पदुकोण बनणार लेडी सिंघम; रोहित शेट्टीची मोठी घोषणा
Rohit Shetty and Deepika PadukoneImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 08, 2022 | 2:58 PM

मुंबई: रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम’ आणि ‘सिंघम रिटर्न्स’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरले. आता याच फ्रँचाइझीमधला आणखी एक चित्रपट ‘सिंघम अगेन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खुद्द रोहितने याची घोषणा केली. अजय देवगणच्या ‘भोला’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर सिंघम अगेनच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. रोहित शेट्टीच्या आगामी ‘सर्कस’ या चित्रपटातील ‘करंट लगा’ हे गाणं नुकतंच मुंबईत लाँच करण्यात आलं. या लाँचच्या कार्यक्रमात रोहितने सिंघम अगेनविषयी मोठी घोषणा केली.

सिंघम अगेनच्या चित्रपटासोबतच रोहितने त्यातील मुख्य अभिनेत्रीचाही खुलासा केला. अभिनेत्री दीपिका पदुकोण यामध्ये लेडी सिंघम साकारणार असल्याचं त्याने सांगितलं.

“लोकांना कुठून तरी कळतंच. त्यामुळे मीच सांगतो की कॉप युनिव्हर्समधला आमचा पुढचा चित्रपट सिंघम 3 आहे. दरवेळी मला लोकं विचारतात की लेडी सिंघम कधी येणार? तर आज मी तुम्हाला सांगतो की सिंघम 3 मध्ये लेडी सिंघम असेल आणि दीपिका पदुकोण ती भूमिका साकारणार आहे”, असं रोहितने जाहीर केलं.

हे सुद्धा वाचा

2023 मध्ये आम्ही या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहोत. दीपिकाचं नाव ऐकल्यानंतर रणवीर सिंग म्हणाला, “माझ्याशिवाय तर सिंघम 3 बनूच शकत नाही. त्यामुळे मीसुद्धा त्यात भूमिका साकारणार आहे.”

रोहित शेट्टी आणि दीपिकाने ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. हा चित्रपटसुद्धा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. आता ‘सिंघम 3’च्या निमित्ताने हे दोघं पुन्हा एकत्र काम करणार आहेत.

रोहित शेट्टीचा ‘सर्कस’ हा चित्रपट ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. आता त्यातील ‘करंट लगा’ हे गाणं लाँच करण्यात आलं. या गाण्यात रणवीरसोबत दीपिका झळकणार आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.