तीन विवाहित अभिनेत्यांसोबत रोमान्स; क्रिकेट कॅप्टनशीही जोडलं गेलं नाव; 49 वर्षी ही अभिनेत्री जगतेय एकाकी जीवन

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांचं खासगी आयुष्य चर्चेत आलंय. यामध्ये एक अभिनेत्रीशी अशीही होती, जिचं नाव तीन विवाहित सुपरस्टार्सशी जोडलं गेलं होतं. इतकंच नव्हे तर क्रिकेट कॅप्टनसोबतही तिच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.

तीन विवाहित अभिनेत्यांसोबत रोमान्स; क्रिकेट कॅप्टनशीही जोडलं गेलं नाव; 49 वर्षी ही अभिनेत्री जगतेय एकाकी जीवन
वयाच्या 49 व्या वर्षी ही अभिनेत्री जगतेय एकाकी आयुष्यImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 14, 2024 | 11:56 AM

मुंबई : 14 मार्च 2024 | बॉलिवूडमध्ये अशा अभिनेत्रींची मोठी यादीच आहे, ज्यांनी एकाकी आयुष्य घालवलंय किंवा अद्याप घालवत आहेत. काहींचं प्रेम पूर्ण होऊ शकलं नाही तर काहींना वैवाहिक आयुष्यात अपयश आलं. अशाच एका अभिनेत्रीचं बॉलिवूडमध्ये एक-दोन नाही तर तीन सुपरस्टार्ससोबत नाव जोडलं गेलं होतं. बॉलिवूड आणि क्रिकेटचं समीकरण तसं फार जुनंच आहे. या अभिनेत्रीचंही एका क्रिकेटरवर प्रेम जडलं होतं. या अफेअर्सनंतरही आता वयाच्या 49 व्या वर्षी ही अभिनेत्री एकाकी आयुष्य जगतेय. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून नगमा आहे. नगमाने बॉलिवूडपासून भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. मात्र खासगी आयुष्यात तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. नगमाचं नाव बॉलिवूडमधल्या तीन सुपरस्टार्स आणि क्रिकेटमधल्या एका कर्णधाराशी जोडलं गेलं होतं.

नगमा ही बॉलिवूडमधल्या त्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक होती, जिच्या प्रेमात अनेकजण वेडे होते. नगमाने ज्या इंडस्ट्रीत काम केलं, त्या इंडस्ट्रीतल्या स्टारशी तिचं नाव जोडलं गेलं. नगमा आधी हिंदी चित्रपटसृष्टीत सक्रिय होती. इथे सलमान खान आणि शाहरुख खान यांसारख्या सुपरस्टार्ससोबत काम करूनही तिला अपेक्षित यश मिळू शकलं नाही. त्यानंतर ती भोजपुरी चित्रपटसृष्टीकडे वळली. याशिवाय नगमाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही काम केलं. आपल्या करिअरमध्ये तिने जवळपास 80 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. मात्र या चित्रपटांपेक्षा ती तिच्या अफेअर्समुळेच अधिक चर्चेत राहिली.

हे सुद्धा वाचा

नगमा सर्वाधिक चर्चेत तेव्हा आली, जेव्हा तिचं नावं क्रिकेट कर्णधार सौरव गांगुलीशी जोडलं गेलं होतं. मात्र यावर दोघांनीही कधीच मौन सोडलं नाही. भोजपुरी चित्रपटसृष्टीत काम करताना नगमाचं नाव मनोज तिवारी आणि रवी किशन यांच्याशीही जोडलं गेलं होतं. हे दोघंही त्यावेळी विवाहित होते. याप्रकरणी मनोज तिवारी यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र रवी किशन यांनी कबूल केलं होतं की ते नगमाला खूप पसंत करतात. या दोघांशिवाय नगमाचं नाव सरथकुमारशीही जोडलं गेलं होतं. मात्र सरथ कुमार आणि नगमा यांचं नातं फार काळ टिकू शकलं नव्हतं. फिल्म इंडस्ट्री सोडल्यानंतर नगमा बऱ्याच काळापासून राजकारणात सक्रिय आहे.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.