सहा महिन्यांच्या लेकीला सोडून अभिनेत्याने थाटला दुसरा संसार, वडिलांना परक्या महिलेसोबत पाहिल्यानंतर…

Marriage Life : मुलगी सहा महिन्यांची असताना 'या' अभिनेत्याने सोडली पहिल्या पत्नीची साथ, लेक 14 वर्षांची झाल्यानंतर वडिलांच्या दुसऱ्या लग्नावर म्हणाली..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रॉनित रॉय याच्या खासगी आयुष्याची चर्चा...

सहा महिन्यांच्या लेकीला सोडून अभिनेत्याने थाटला दुसरा संसार, वडिलांना परक्या महिलेसोबत पाहिल्यानंतर...
Follow us
| Updated on: Jan 14, 2024 | 11:27 AM

मुंबई | 14 जानेवारी 2024 : झगमगत्या विश्वात असे अनेक कपल आहेत… ज्यांनी पहिली पती आणि मुलांना सोडून दुसरा संसार थाटला. अशाच अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अभिनेता रॉनित रॉय… रॉनित रॉय याने नुकताच वयाच्या 58 व्या वर्षी मोठ्या थाटात लग्नाचा 20 वा वाढदिवस सारजा केला. रॉनित याच्या वैवाहिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष निलम सिंग हिला डेट केल्यानंतर रॉनित याने 2003 मध्ये लग्न केलं. निलम हिच्यासोबत रॉनित याचं दुसरं लग्न आहे. रॉनित याचं पहिलं लग्न झोआना मुमताज नावाच्या एक महिलेसोबत झालं होतं. रॉनित आणि झोआना यांना एक मुलगी देखील आहे.

रॉनित आणि पहिल्या पत्नीमुलगी आता 32 वर्षांची झाली आहे. लेक फक्त सहा महिन्यांची असताना रॉनित आणि झोआना यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर रॉनित याला लेकीसोबत फार काळ राहाता आलं नाही… ज्याची खंत आजही अभिनेत्याच्या मनात आहे. एका मुलाखतीत याबद्दल रॉनित याने मोठा खुलासा देखील केला होता. रॉनित यांच्या मोठ्या मुलीचं नाव ओना असं आहे…

रॉनित म्हणाला होता, ‘पहिल्या पासून माझी एक मुलगी आहे. जिच्याप्रती माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत. निलम हिच्यासोबत जेव्हा माझी भेट झाली, तेव्हा माझी मुलगी फक्त 14 वर्षांची होती. मला आजही आठवत आहे… आम्ही कारमध्ये बसलो होतो. निलम माझ्या जवळ बसली होती आणि ओना देखील आमच्यासोबत होती…’

हे सुद्धा वाचा

पुढे रॉनित म्हणाली, ‘निलम हिला जेव्हा आम्ही तिच्या घरापर्यंत सोडलं… तेव्हा मी ओनाला म्हणालो, मला तुझ्यासोबत बोलायचं आहे… यावर ओना म्हणाली, मला माहिती आहे बाबा तिला निलम हिच्यासोबत लग्न करायचं आहे… ओना आणि माझा सहवास फक्त सहा महिन्यांचा होता… पण मी तिचा बाप आहे, हे तिला माहिती होतं…’

‘मी माझ्या लेकीला वर्षातून फक्त एकदा बोलावलं होतं. ते देखील फार कमी क्षणांसाठी… मी माझ्या लेकीच्या आयुष्यातील 20 वर्ष मिस केले आहेत. मला ओनाची प्रचंड आठवण यायची… गेल्या दिवसांचा विचार केला तरी मला प्रचंड दुःख होतं… पण ती आता मोठी होत आहे आणि आमचं बाप – लेकीचं नातं अधिक घट्ट होत आहे…’ असं देखील रॉनित रॉय म्हणाला आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.