Ronit Roy : जे शत्रूसोबतही करायचा विचार करत नाही, ते रोनित रॉयसोबत घडलंय? पोस्टवर स्मृती इराणींचीही कमेंट

| Updated on: Apr 19, 2023 | 5:30 PM

या पोस्टने सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. 'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने त्यावर लिहिलं, 'मी तुला समजू शकते. तू त्या गोष्टीला मनाला लावून घेऊ नकोस आणि पुढे जा. एकला चलो रे.'

Ronit Roy : जे शत्रूसोबतही करायचा विचार करत नाही, ते रोनित रॉयसोबत घडलंय? पोस्टवर स्मृती इराणींचीही कमेंट
Ronit Roy
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता रोनित रॉयने मंगळवारी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली. ही पोस्ट फसवणुकीच्या बाबत होती. त्यात त्याने ‘भाऊ’ या शब्दाचाही उल्लेख केला होता. या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी काळजी व्यक्त केली. इतकंच नव्हे तर अभिनेत्री आणि नेत्या स्मृती इराणी यांनीसुद्धा कमेंट करत ‘काय झालं’ असा प्रश्न विचारला आहे. रोहित आणि रोनित रॉय ही भावंडं टेलिव्हिजन इंडस्ट्रीत गेल्या बऱ्याच वर्षांपासून सक्रिय आहेत. त्यामुळे या भावंडांमध्ये काही वाद झाला आहे का, असाही सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

रोनित रॉयची पोस्ट-

‘भाई.. भाऊ या शब्दांनी त्यांचा अर्थ पूर्णपणे गमावला आहे. जेव्हा कोणी मला भाऊ म्हणतं, तेव्हा मी त्यांचे शब्द गंभीरतेने घेते आणि त्यानंतर ते जे माझ्यासोबत करतात ते मी माझ्या शत्रूंसोबतही कधी करत नाही. अशा गोष्टींमुळे दु:ख होतं पण ठीक आहे. हा कमीपणा त्यांच्या स्वभावात आहे, माझ्या नाही’, अशी ही पोस्ट आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये रोनितने लिहिलंय, ‘पैसा, प्रसिद्धी, गमावलेल्या सर्व गोष्टी परत मिळवता येतात. वेळ, प्रेम, आदर आणि नाती एकदा गमावली की परत मिळवता येत नाहीत. मिळाली तरी त्यांना पहिल्यासारखं महत्त्व नसतं. जेव्हा तुम्हाला खरं राहण्याची गरज असते तेव्हा बनावट का व्हावं?’

हे सुद्धा वाचा

या पोस्टने सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. ‘अनुपमा’ फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने त्यावर लिहिलं, ‘मी तुला समजू शकते. तू त्या गोष्टीला मनाला लावून घेऊ नकोस आणि पुढे जा. एकला चलो रे.’ तर अभिनेत अनुज सचदेवाने लिहिलं, ‘तू बरोबर बोललास. आजकाल या शब्दांना काहीच महत्त्व उरलेलं नाही. (ब्रो म्हणजे हाय म्हटल्यासारखं, सॉरी म्हणजे चिल म्हटल्यासारखं आणि रिलॅक्स म्हणजे F**k it).’

नेटकऱ्यांनीही रोनित रॉयच्या या पोस्टवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘सर, आजकाल युट्यूबवरील सर्व व्हिडीओंमध्य हेच शब्द ऐकायला मिळतात. त्यामुळे आणखी चिडचिड होते’, असं एकाने लिहिलंय. तर दुसरा म्हणाला, ‘तुमचं खरं आहे. लोक त्यांच्या गरजेनुसार वागतात. गरज संपली की भाईबंदी पण संपली.’ रोनित रॉयने बऱ्याच हिंदी मालिकांमध्ये काम केलंय. त्याचसोबत तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.