पत्नीसोबतच दुसऱ्यांदा लग्न केल्यानंतर 58 वर्षीय अभिनेता जाणार हनिमूनला

'कसौटी जिंदगी की' या मालिकेत मिस्टर बजाजची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता रोनित रॉयने पत्नी नीलमशीच दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. लग्नाच्या विसाव्या वाढदिवसानिमित्त रोनितने पुन्हा लग्न केलं. आता पत्नीसोबत दुसऱ्यांदा हनिमूनला जाणार असल्याचा खुलासा त्याने केला आहे.

पत्नीसोबतच दुसऱ्यांदा लग्न केल्यानंतर 58 वर्षीय अभिनेता जाणार हनिमूनला
रोनित रॉयने पत्नीशीच केलं दुसऱ्यांदा लग्नImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 27, 2023 | 3:05 PM

मुंबई : 27 डिसेंबर 2023 | टेलिव्हिजन आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता रोनित रॉय सध्या त्याच्या लग्नामुळे चर्चेत आहे. 25 डिसेंबर रोजी लग्नाच्या विसाव्या वाढदिवसानिमित्त त्याने पत्नीशीच दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. त्याचे व्हिडीओसुद्धा त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. आता दुसऱ्यांदा लग्न केल्यानंतर रोनित आणि त्याची पत्नी नीलम हे दुसऱ्यांदा हनिमूनलाही जाणार आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने याचा खुलासा केला. पत्नी नीलमच्या आवडत्या ठिकाणी हनिमूनला जाणार असल्याचं त्याने सांगितलं.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत रोनित म्हणाला, “खूप चांगलं वाटतंय. आम्ही आता दुसऱ्यांदा हनिमूनला जाणार आहोत. नीलमच्या आवडत्या ठिकाणी ॲम्स्टरडॅम आणि गस्तादला. दुसऱ्यांदा हनिमूनला जाणं ऐकल्यावर लोकांना थोडं वेगळं वाटू शकतं. पण इतक्या वर्षांत आम्ही मुलांशिवाय कुठे फिरायला गेलोच नाही. त्यामुळे आता आम्ही प्लॅन केला. कारण माझी मुलगी लॉस अँजेलिसमध्ये शिकतेय आणि मुलगासुद्धा परदेशात जाणार आहे.”

हे सुद्धा वाचा

25 डिसेंबर रोजी रोनित रॉय आणि नीलम यांनी त्यांच्या गोव्यामधील फार्महाऊसवर विधीवत पुन्हा एकदा लग्न केलं. ‘दुसऱ्यांदा काय, हजार वेळा मी तुझ्याशीच लग्न करेन. लग्नाच्या 20 व्या वाढदिवसानिमित्त तुला शुभेच्छा’, असं कॅप्शन देत रोनितने लग्नाचे व्हिडीओ पोस्ट केले होते. रोनित रॉय आणि नीलम बोस यांनी 2003 मध्ये लग्न केलं होतं. त्याआधी साडेतीन वर्षांपर्यंत दोघं एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या लग्नसोहळ्याला इंडस्ट्रीतील बरेच कलाकार उपस्थित होते. मुंबईतील मड आयलँड याठिकाणी द रिसॉर्ट हॉटेलमध्ये रोनित आणि नीलमने लग्न केलं होतं. या लग्नसोहळ्याला झरीना वहाब, आदित्य पांचोली, अपूर्व अग्निहोत्री, प्रेम चोप्रा, सोनू निगम, करिश्मा तन्ना, अली असगर यांसारखे सेलिब्रिटी उपस्थित होते.

पहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Ronit Roy (@ronitboseroy)

रोनित रॉयने ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेत मिस्टर बजाजची भूमिका साकारली होती. त्याने पहिलं लग्न जोआनाशी केलं होतं. या दोघांना एक मुलगी असून तिचं नाव ओना असं आहे. रोनित आणि जोआना हे 1997 मध्ये विभक्त झाले आणि त्यानंतर तो नीलमला डेट करू लागला.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.