Roohi Box Office Prediction | राजकुमार-जान्हवीची जोडी प्रेक्षकांना भावणार? ‘रूही’ पहिल्याच दिवशी जमवेल इतका गल्ला…

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव, वरुण शर्मा आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांचा ‘रूही’ हा ‘हॉरर-कॉमेडी’ चित्रपट 11 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. लॉकडाऊननंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा हा पहिला मोठा हिंदी चित्रपट आहे.

Roohi Box Office Prediction | राजकुमार-जान्हवीची जोडी प्रेक्षकांना भावणार? ‘रूही’ पहिल्याच दिवशी जमवेल इतका गल्ला...
रूही चित्रपट
Follow us
| Updated on: Mar 10, 2021 | 4:13 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव, वरुण शर्मा आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांचा ‘रूही’ हा ‘हॉरर-कॉमेडी’ चित्रपट 11 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. लॉकडाऊननंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा हा पहिला मोठा हिंदी चित्रपट आहे. लॉकडाऊन आधी इरफान खानचा ‘इंग्लिश मीडियम’ हा चित्रपट गेल्या वर्षी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट 12 मार्च 2020 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. आता तब्बल एक वर्षानंतर मोठा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला प्रेक्षक तसेच चित्रपटाच्या विश्लेषकांकडून खूप अपेक्षा आहेत (Roohi Box Office Prediction janhvi kapoor and rajkumar rao film will make 3 cr on first day).

‘रुही’ हा राजकुमार राव यांच्या ‘स्त्री’ या चित्रपटाचा सिक्वल आहे. ‘स्त्री’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी 7 कोटींचा व्यवसाय केला आणि चांगला रीव्हीव्हू देखील मिळाला. हा चित्रपट पाहिल्यानंतर राजकुमारच्या ‘रुही’ चित्रपटापासून चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. हा चित्रपट आता चित्रपटगृहांमध्ये किती चालेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.

पहिल्याच दिवशी कमवू शकतो इतका गल्ला…

रिपोर्ट्सनुसार, ‘रुही’ पहिल्याच दिवशी 3 कोटींचा व्यवसाय करू शकतो. चित्रपटाचा ट्रेलर सर्वांनाच आवडला आहे. यासह हा चित्रपट महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदर्शित होत आहे. या दिवसाची सुट्टी नक्कीच चित्रपटाला फायदा करून देईल. प्रेक्षक ‘रुही’ पाहण्यासाठी थिएटरमध्ये येऊ शकतात.

महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना प्रकरणाचा परिणाम राजकुमार आणि जान्हवी यांच्या ‘रुही’ चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होऊ शकतो. तसेच, 50 टक्के क्षमतेसह अनेक राज्यांमध्ये थिएटर सुरू आहेत. याचा देखील महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो (Roohi Box Office Prediction janhvi kapoor and rajkumar rao film will make 3 cr on first day).

अशी आहे चित्रपटाची कथा

‘रुही’ची कहाणी एका चेटकिणीची आहे, जी लग्न सोहळा असणाऱ्या घरांवर नजर आहे. नवरदेव झोपला की, ती नववधूला आपल्याबरोबर घेऊन जाते. राजकुमार राव आणि वरुण शर्मा हा जादूटोणा दूर करण्याची जबाबदारी स्वीकारतात. यासाठी दोघही जान्हवीला पळवून नेतात आणि तिच्या आतून चेटकीण बाहेर कढण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरतात. या सगळ्यामध्ये प्रेक्षकांना कॉमेडी देखील पाहायला मिळणार आहे.

दिनेश विजन ‘रुही’ चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. राजकुमार राव आणि दिनेश विजान या चित्रपटात प्रथमच एकत्र येत नाहीयत, तर त्याआधी दोघांनी ‘स्त्री’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटात एकत्र काम केले होते. राजकुमार राव ‘स्त्री’मध्ये मुख्य भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात श्रद्धा कपूर त्याच्यासोबत दिसली. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता.

(Roohi Box Office Prediction janhvi kapoor and rajkumar rao film will make 3 cr on first day)

हेही वाचा :

KRK vs SRK | कमाल खानचा किंग खानशी मोठा पंगा, सोशल मीडियावर लीक केली ‘पठाण’ची कथा!

आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.