‘तुझ्या गेल्या जन्माचे पाप…’, कर्करोगाने त्रस्त अभिनेत्री ट्रोलर्सच्या निशाण्यावर
कर्करोगामुळे होणारा त्रास अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला, पण...
Rozlyn Khan on her cancer : अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यातील चांगल्या-वाईट गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. पण एका अभिनेत्रीला आपल्या आजाराबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करणं महागात पडलं आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून रोझलिन खान (Rozlyn Khan) आहे. रोझलिन कर्करोगाने त्रस्त आहे. सध्या अभिनेत्रीवर उपचार सुरु आहेत. पण जेव्हा कर्करोगामुळे होणारा त्रास अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला, तेव्हा तिला ट्रोलर्सने निशाण्यावर धरलं.
रिझलिनला oligometastatic कर्करोग झाला आहे. अभिनेत्री कर्करोगाच्या चौथ्या टप्प्यात आहे. दरम्यान, अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिला आलेला अनुभव व्यक्त केला. ‘जेव्हा मला कर्करोगचं निदान झालं, तेव्हा मला याबद्दल बोलायचं होतं. पण तेव्हा लोकांची प्रतिक्रिया फार वेगळी होती. भारतात अद्यापही कर्करोगाबद्दल लोकांची मानसिकता वेगळी आहे.’
अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘तिसऱ्या किमो सेशननंतर मी माझे केस गमावले. पण यावर लोकांची प्रतिक्रिया फार वेगळी होती.’ जेव्हा अभिनेत्रीने कर्करोगाबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना सांगितलं, तेव्हा तिला अनेकांनी ट्रोल केलं.
View this post on Instagram
कर्करोगावर पोस्ट शेअर करताच अनेक जण अभिनेत्रीला म्हणाले, ‘कर्करोग तुझं कर्म आहे, हे तुझ्या गेल्या जन्माचे पाप आहेत…’ असे कमेंट करत ट्रोलर्सने अभिनेत्रीला निशाण्यावर धरलं. अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘जर तुम्ही एखाद्या महिलेची ओळख तिच्या केसांच्या लांबीवरून करत आहात, तर कोणत्या सोसायटीमध्ये जगत आहोत.’
‘जेव्हा मी पहिल्यांदा डॉक्टरांना भेटली तेव्हा त्यांनी मला तुला केस गमवावे लागतील असं सांगितलं, तेव्हा मला प्रचंड वाईट वाटलं, मी रडली सुद्धा. या आजारातून मी बाहेर येईल की नाही ते देखील मला माहिती नाही. मरण कधीही येवू शकतं.’
अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘कर्करोगापेक्षा जास्त भयानक किमोथेरपी आहे. किमोनंतर मी जवळपास ७ दिवस बेडवरून उठू शकत नाही. मिठाशिवाय कोणत्याच पदार्थाची चव लागत नाही. किमोनंतर मी फक्त लिक्विडवर असते.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.