Jr NTR सिनेमात काम करणं करणार बंद? अभिनेत्याचा मोठा खुलासा

नाटू - नाटू गाण्यावर थिरकल्यानंतर ज्युनियर एनटीआरने सिनेमात काम न करण्याचा घेतला निर्णय, जाणून घ्या काय म्हणाला अभिनेता? सर्वत्र अभिनेत्याच्या वक्तव्याची चर्चा

Jr NTR सिनेमात काम करणं करणार बंद? अभिनेत्याचा मोठा खुलासा
Natu NatuImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Mar 22, 2023 | 11:26 AM

मुंबई : ‘आरआरआर’ (RRR) सिनेमात ‘नाटू-नाटू’  (naatu naatu) गाण्यावर भन्नाट डान्स करून अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआर (jr ntr) यांनी अनेकांना ‘नाटू-नाटू’ गाण्यावर ठेका धरण्यास भाग पाडलं. ‘नाटू-नाटू’ गाण्यावर थिरकणारे चाहते फक्त भारतातच नाही तर, परदेशात देखील आहेत. अनेकांच्या मनात स्थान भक्कम केल्यानंतर ‘नाटू-नाटू’ गाण्याने ऑस्कर पुरस्कारावर देखील स्वतःचं नाव कोरलं. आजही ‘नाटू-नाटू’ गाण्याची चर्चा सर्वत्र रंगलेली असते. अशात सिनेमात मुख्य भूमिका बजावणाऱ्या ज्यूनियर एनटीआर याने एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे अभिनेता तुफान चर्चेत आला आहे.

सिनेमा काम करणं बंद करेल असं वक्तव्य अभिनेत्याने केल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का लागला आहे. या वक्तव्याचं स्पष्टीकरण देखील अभिनेत्याने दिलं आहे. तेलुगू सिनेमांचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआर कायम चर्चेत असतो. एकापाठोपाठ एक हिट सिनेमे देणाऱ्या ज्युनियर एनटीआरचे चाहतेही त्याच्या नवीन सिनेमांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

पण आता अभिनेत्याने केलेल्या वक्तव्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अभिनेता म्हणाला सिनेमांमध्ये काम करणं थांबवणार आहे. नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात अभिनेत्याचं असं वक्तव्य केलं आहे. अभिनेता सध्या ‘एनटीआर 30’ सिनेमामुळे चर्चेत आहे. कार्यक्रमादरम्यान एका चाहत्यांने अभिनेत्याला विचारलं, ‘आगामी सिनेमा कोणता आहे…’

हे सुद्धा वाचा

चाहत्याच्या प्रश्नाचं विनोदी अंदाजात उत्तर देत अभिनेता म्हणाला, ‘मी कोणताही सिनेमा करत नाहीये. जर तु्म्ही सतत मला एकच प्रश्न विचारणार असाल, तर सिनेमात काम करणं बंद करेल. ‘ ज्युनियर एनटीआरचं उत्तर ऐकल्यानंतर चाहते हैराण झाले. पण त्यानंतर ज्युनियर एनटीआर याने स्वतःच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं. (rrr movie full form 2022)

ज्युनियर एनटीआर म्हणाला, ‘मी मस्करीत म्हणालो. सिनेमात काम न करण्याचा निर्णय मी अद्याप घेतलेला नाही…’ असं देखील अभिनेता म्हणाला. ज्यानंतर चाहत्यांनी मोकळा श्वास घेतला. ज्युनियर एनटीआर याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. एवढंच नाही तर, अभिनेत्याला सतत मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

ज्युनियर एनटीआर कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. अनेक ठिकाणी अभिनेत्याला पाहिल्यानंतर त्याची एक झलक पाहण्यासाठी आणि अभिनेत्यासोबत फोटो काढण्यासाठी चाहते एकच गर्दी करतात. पण नाटू नाटू गाण्याच्या लोकप्रियतेनंतर ज्युनियर एनटीआर याच्या चाहत्यांच्या संख्येत देखील मोठी वाढ झाली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याचीच चर्चा आहे.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.