RRR Movie : आरआरआरच्या रिलीजची फायनल तारीख ठरली, कोणत्या तारखेली रिलीज? वाचा एका क्लिकवर
एसएस राजमौलीच्या बहुचर्चीत आरआरआर सिनेमाची अंतिम तारीख ठरली आहे. येत्या 25 मार्चला रिलीज होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दादासाहेब कारंडे, प्रतिनिधी, मुंबई : एसएस राजमौलीच्या (S S Rajmouli) बहुचर्चीत आरआरआर सिनेमाच्या रिलीजची (RRR Movie Release Date) अंतिम तारीख ठरली आहे. हा सिनेमा येत्या 25 मार्चला रिलीज होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. एनटीआर आणि रामचरण (NTR, Ramcharan) आणि आलिया या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. तर सुपरस्टार अभिनेता अजय देवगणही या सिनेमात महत्वाची भूमिका बजावत आहे. मनोरंजन जगात या सिनेमाचा मोठा बोलबाला आहे. राजमौलीला बहुबली या ऐतिहासिक ब्लॉकब्लास्टरचा दिग्दर्शक म्हणून ओळखले जाते. कोरोनाचा प्रत्येक क्षेत्राप्रमाणेच चित्रपटसृष्टीवरही मोठा परिणाम झाला. कोरोनामुळे जिम, रेस्टॉरंट, सिनेमा हॉल अशी सर्व गर्दीची ठिकाणे बंद होती. अलीकडे सर्व काही रुळावर येऊ लागले,दिग्दर्शक एसएस राजामौली सध्या आपला चित्रपट पुढे ढकलण्याच्या मनस्थितीत नाहीत. ओमिक्रॉन संकटाच्या काळात ‘RRR’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
25 मार्चला आरआरआर रिलीज होणार
#RRRonMarch25th, 2022….. FINALISED! ??@ssrajamouli @tarak9999 @AlwaysRamCharan @ajaydevgn @aliaa08 @RRRMovie @DVVMovies #RRRMovie pic.twitter.com/622qfdRUUX
— DVV Entertainment (@DVVMovies) January 31, 2022
एसएस राजामौली यांचा ‘आरआरआर’ हा बिग बजेट चित्रपट आहे. यामध्ये दाक्षिणात्य आणि बॉलिवूडमधील अनेक नामवंत स्टार्स एकत्र काम करताना दिसणार आहेत. अभिनेता रामचरण, ज्युनियर एनटीआर, अजय देवगण आणि आलिया भट्ट RRR चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. राजामौली यांनी त्यांच्या निर्णयाचे कारण स्पष्ट केले आणि सांगितले की त्यांचा पीरियड ड्रामा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे. हा बहुप्रतिक्षित चित्रपट असून, हा सिनेमा जुलै 2020 मध्येच रिलीज होणार होता, पण कोरोना आणि प्रोडक्शन विलंबामुळे या सिनेमाच्या रिलीजला आधीच विलंब झाला आहे. त्यामुळे दिग्दर्शक राजामौली यांना त्यांच्या निर्णयावर ठाम राहायचे असून, आता या चित्रपटासाठी ते कोणताही धोका पत्करण्यास तयार आहे.
दिग्दर्शक राजामौली यांचा हा चित्रपट भारतीय इतिहासातील ‘अल्लुरी सीताराम राजू’ आणि ‘कोमाराम भीम’ या दोन वास्तविक जीवनातील नायकांच्या जीवनावर आधारित आहे. ‘अल्लुरी सीताराम राजू’ आणि ‘कोमाराम भीम’ ही नावे भारतीय इतिहासात दिसत नसली, तरी त्यांच्याबद्दल जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. ब्रिटिश काळातील या दोन नायकांच्या शौर्याने प्रभावित होऊन दिग्दर्शक राजामौली यांनी 5 वर्षांपूर्वी RRR हा तमिळ चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटात जबरदस्त अॅक्श तडख्यासह तुफान एनटरटेनमेंटचा आनंद प्रेक्षकांना मिळणार आहे.