राजामौलींच्या वडिलांनी दिली RRR 2 बद्दल मोठी अपडेट; सीक्वेलमध्ये दाखवणार दुसरी कथा पण दिग्दर्शन मात्र..

देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीचा 1920 चा काळ RRR या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. अल्लुरी सीताराम राजू (रामचरण) आणि कोमाराम भीम (ज्युनियर एनटीआर) या दोन क्रांतिकारकांभोवती ही कथा फिरते. इतिहासातील ही दोन महत्त्वाची नावं जरी घेतली असली तरी चित्रपटाची संपूर्ण कथा ही काल्पनिक आहे.

राजामौलींच्या वडिलांनी दिली RRR 2 बद्दल मोठी अपडेट; सीक्वेलमध्ये दाखवणार दुसरी कथा पण दिग्दर्शन मात्र..
RRRImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 11, 2023 | 8:58 AM

मुंबई : एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘RRR’ या चित्रपटाने केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात आपल्या यशाचा झेंडा फडकवला. 2022 या वर्षाती हा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता. यातील ‘नाटू नाटू’ या गाण्यानेही प्रतिष्ठित ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावत इतिहास रचला. त्यानंतर आता या चित्रपटाविषयी महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. राजामौली यांचे वडील आणि दिग्गज पटकथालेखक विजयेंद्र प्रसाद यांनी RRR च्या सीक्वेलविषयी मोठी घोषणा केली आहे. या सीक्वेलच्या कथेवर सध्या काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले की, RRR चा सीक्वेल हा हॉलिवूड प्रोजेक्ट असेल. हॉलिवूड दिग्दर्शक या सीक्वेलचं दिग्दर्शन करणार आहे.

विजयेंद्र यांनी हेसुद्धा यावेळी जाहीर केलं की रामचरण आणि ज्युनियर एनटीआरच या सीक्वेलमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहेत. मात्र RRR ची तीच कथा सीक्वेलमध्ये पुढे जाणार नाही. स्वातंत्र्यपूर्व काळातील तेलुगू राज्यांमधील दुसऱ्या प्रकरणावर आधारित त्याची कथा असू शकते. “रामचरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या RRR चित्रपटाच्या सीक्वेलवर आम्ही काम करतोय. या चित्रपटाचं दिग्दर्शक एस. एस. राजामौलीच करणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र चित्रपटावर त्यांचं बारकाईने लक्ष असेल. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हा चित्रपट बनवला जाईल”, असं विजयेंद्र प्रसाद म्हणाले.

याआधी राजामौलींनीही सीक्वेलविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली होती. शिकागोमध्ये पार पडलेल्या RRR च्या स्क्रीनिंगदरम्यान राजामौलींना सीक्वेलबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, “मी सीक्वेलविषयी सध्या फार काही माहिती देऊ शकत नाही. पण एवढं नक्कीच सांगू शकतो की माझे वडील, ज्यांनी RRR सह आतापर्यंत माझ्या प्रत्येक चित्रपटाची पटकथा लिहिली आहे, त्यांच्यासोबत मी यावर चर्चा केली आहे. ते सध्या कथेवर काम करत आहेत.”

हे सुद्धा वाचा

देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीचा 1920 चा काळ RRR या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. अल्लुरी सीताराम राजू (रामचरण) आणि कोमाराम भीम (ज्युनियर एनटीआर) या दोन क्रांतिकारकांभोवती ही कथा फिरते. इतिहासातील ही दोन महत्त्वाची नावं जरी घेतली असली तरी चित्रपटाची संपूर्ण कथा ही काल्पनिक आहे. RRR या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि रामचरण यांच्या मुख्य भूमिका होत्या. तर आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनीसुद्धा चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. राजामौली यांचे वडील आणि पटकथालेखक विजयेंद्र प्रसाद हे सीक्वेलची कथा लिहित आहेत.

दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?.
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले.