Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एस. एस. राजामौलींच्या RRR चित्रपटातील अभिनेत्याचं निधन; सिनेसृष्टीवर शोककळा

RRR या चित्रपटाशिवाय रे स्टीवेन्सन यांनी 'थॉर' फ्रँचाइजीमधील 'वॉल्स्टॅग' आणि 'वायकिंग्स'मध्ये ओथेरेची भूमिका साकारली होती. त्याचसोबत ॲनिमेटेड स्टार वॉर्स सीरिज 'द क्लोन वॉर्स' आणि 'रिबेल्स'मध्ये गार सेक्सनला त्यांनी आवाज दिला होता.

एस. एस. राजामौलींच्या RRR चित्रपटातील अभिनेत्याचं निधन; सिनेसृष्टीवर शोककळा
RRRImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 23, 2023 | 7:57 AM

इटली : एस. एस. राजामौली दिग्दर्शित RRR या चित्रपटाने केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्धी मिळवली. चित्रपटात रामचरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्यावर चित्रित झालेल्या ‘नाटू नाटू’ या गाण्याने प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार पटकावला. मात्र या चित्रपटातील एका कलाकाराबाबत दु:खद बातमी समोर येत आहे. यामध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता रे स्टीवेन्सन यांचं इटलीत निधन झालं. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आरआरआर चित्रपटाच्या टीमकडून त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. ‘आम्हा सर्वांसाठी ही अत्यंत धक्कादायक बातमी आहे. तुम्ही सदैव माझ्या मनात राहाल, सर स्कॉट’, अशा शब्दांत RRR टीमकडून शोक व्यक्त करण्यात आला.

अवघ्या दोन दिवसांत म्हणजेच 25 मे रोजी रे स्टीवेन्सन त्यांचा 59 वा वाढदिवस साजरा करणार होते. त्यांचं निधन कोणत्या कारणामुळे झालं, याबद्दलची माहिती अद्याप त्यांच्या पीआर एजन्सीकडून देण्यात आली नाही. स्टीवेन्सन यांनी RRR या चित्रपटात मुख्य खलनायक स्कॉट बक्सटनची भूमिका साकारली होती. त्यांनी साकारलेल्या भूमिकेचं प्रेक्षक-समीक्षकांकडून तोंडभरून कौतुक झालं होतं. या चित्रपटात रामचरण, ज्युनियर एनटीआर, आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता.

हे सुद्धा वाचा

RRR या चित्रपटाशिवाय रे स्टीवेन्सन यांनी ‘थॉर’ फ्रँचाइजीमधील ‘वॉल्स्टॅग’ आणि ‘वायकिंग्स’मध्ये ओथेरेची भूमिका साकारली होती. त्याचसोबत ॲनिमेटेड स्टार वॉर्स सीरिज ‘द क्लोन वॉर्स’ आणि ‘रिबेल्स’मध्ये गार सेक्सनला त्यांनी आवाज दिला होता. डिस्ने प्लसच्या आगामी ‘द मंडलोरियन स्पिनऑफ’ ‘Ahsoka’मध्ये रोसारियो डाव्सनसोबत ते झळकणार होते.

रे स्टीवन्सेन यांचा जन्म 25 मे 1964 रोजी उत्तरी आयर्लंडमधील लिस्बर्नमध्ये झाला. त्यांनी 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला युरोपीय टीव्ही सीरिज आणि टेलीफिल्म्समधून करिअरची सुरुवात केली होती. पॉल ग्रीनग्रास यांच्या 1998 मधील नाटक ‘द थ्योरी ऑफ फ्लाइट’मध्ये हेलेना बोनहम कार्टर आणि केनेथ ब्रानघ यांच्यासोबत ते पहिल्यांदा मोठ्या स्क्रीनवर दिसले होते. अँटोनी फूक्चाच्या ‘किंग आर्थर’, लेक्सी ॲलेक्झांडरच्या ‘पनिशर : वॉर झोन’, ह्युजेन ब्रदर्सच्या ‘द बुक ऑफ एली’ आणि ॲडम मॅककेच्या ‘द अदर बॉय’ या चित्रपटांमध्येही त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या.

स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.