मुंबई : टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलैक (Rubina Dilaik) ही कायमच चर्चेत असते. रुबीना दिलैक हिने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांनी केलीये. रुबीना दिलैक हिने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. इतकेच नाही तर रुबीना दिलैक ही कायमच सोशल मीडियावरही सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी रुबीना दिलैक ही नेहमीच खास फोटो (Photo) आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. रुबीना दिलैक हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.
गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चा आहे की, रुबीना दिलैक ही प्रेग्नेंट आहे. पुढच्या वर्षी रुबीना दिलैक ही तिच्या आणि अभिवन शुक्लाच्या पहिल्या बाळाला जन्म देईल. रुबीना दिलैक हिने आपल्या प्रेग्नेंसीबद्दल अजूनही काही भाष्य केले नाहीये. रुबीना दिलैक हिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्या व्हिडीओनंतरच चर्चा सुरू झाली की, रुबीना दिलैक ही प्रेग्नेंट आहे.
रुबीना दिलैक हिच्या प्रेग्नेंसीची चर्चा सुरू असतानाच आता रुबीना दिलैक हिने एक जबरदस्त असे फोटोशूट केले आहे. रुबीना दिलैक हिने शेअर केलेल्या या फोटोशूटमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसत आहे. रुबीना दिलैक हिच्या या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत.
रुबीना दिलैक हिने चक्क हे फोटोशूट बिकिनीवर गेले आहे. पाण्यामध्ये ग्लॅमरसचा तडका लावताना रुबीना दिलैक ही दिसत आहे. विशेष म्हणजे या फोटोमध्ये रुबीना दिलैक ही चक्क बिकिनीवर दिसत आहे. रुबीना दिलैक हिचा हा लूक तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे दिसत आहे. चाहते या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.
टीव्ही मालिकेच्या संस्कारी सुनेचे हे बिकिनीवरील जबरदस्त फोटो पाहून लोक कमेंटचा वर्षाव करत आहेत. रुबीना दिलैक हिने काही दिवसांपूर्वीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये रुबीना दिलैक हिला तिच्या प्रेग्नेंसीबद्दल विचारण्यात आले. मात्र, यावेळी रुबीना दिलैक हिने यावर भाष्य करणे टाळल्याचे बघायला मिळाले.
रुबीना दिलैक ही काही वर्षांपूर्वीच बिग बाॅसच्या घरात पती अभिनव शुक्ला याच्यासोबत सहभागी झाली. यावेळी बिग बाॅसच्या घरात धमाकेदार गेम खेळताना रुबीना दिलैक ही दिसली. इतकेच नाही तर रुबीना दिलैक ही बिग बाॅसची विजेता देखील आहे. बिग बाॅसनंतर लगेचच रुबीना दिलैक ही खतरो के खिलाडीमध्येही सहभागी झाली होती.