Rubina Dilaik | कार अपघातानंतर रुबिनाने दिली हेल्थ अपडेट; म्हणाली ‘मोठा धक्का बसला असून..’

रुबीनाच्या कारचा पाठचा भाग बराच डॅमेज झाला आहे. अभिनव आणि रुबिनाच्या या ट्विटवर मुंबई ट्रॅफिक पोलिसांनीही ट्विट केलं आहे. 'ज्याठिकाणी दुर्घटना घडली आहे, तिथल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये घटनेची तक्रार नोंदवा', असं त्यांनी म्हटलंय.

Rubina Dilaik | कार अपघातानंतर रुबिनाने दिली हेल्थ अपडेट; म्हणाली 'मोठा धक्का बसला असून..'
Rubina DilaikImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jun 11, 2023 | 11:28 AM

मुंबई : टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आणि बिग बॉस या रिॲलिटी शोची विजेती रुबिना दिलैकच्या कारचा नुकताच अपघात झाला. या अपघातानंतर तिने ट्विट करत आरोग्याची माहिती दिली आहे. रुबिनाचा पती अभिनव शुक्लाने अपघातानंतर कारचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले होते. त्याचसोबत रुबिनाच्या प्रकृतीची माहिती दिली होती. ‘अपघातामुळे माझ्या डोक्याला आणि पाठीला मार लागला आहे. घडलेल्या घटनेनंतर मला मोठा धक्का बसला आहे. मेडिकल टेस्ट केले असून सर्वकाही ठीक आहे. निष्काळजीपणा करणाऱ्या ट्रक ड्राइव्हरविरोधात कारवाई केली जात आहे. कारचंही नुकसान झालं आहे. रस्त्यावर सावधगिरी बाळगण्याचं आवाहन मी करते. नियम हे आपल्या सुरक्षिततेसाठीच असतात’, असं तिने लिहिलं आहे.

अभिनवने कारचे फोटो पोस्ट करत लिहिलं होतं, ‘हे आमच्यासोबत घडलंय आणि हे कोणासोबतही घडू शकतं. फोनवर बोलणाऱ्या ट्रॅफिकदरम्यान रस्ता ओलांडणाऱ्या मूर्खांपासून सावधान रहा. त्याहून मोठी गोष्ट म्हणजे लोकं तिथे हसत उभे होते. नेमकं काय घडलंय याची माहिती नंतर देतो. रुबिना कारमध्ये होती आणि ती आता ठीक आहे. तिला मेडिकल टेस्टसाठी घेऊन जातोय. मी मुंबई पोलिसांना अशा लोकांविरोधात कठोर कारवाई करण्याची विनंती करतो.’

हे सुद्धा वाचा

अभिनवने ट्विटमध्ये कारचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. पुलाखालील रस्त्यावर या दोन कार उभ्या आहेत. या फोटोतून कारचं प्रचंड नुकसान झाल्याचं दिसून येत आहे. रुबिनाच्या कारला एका दुसऱ्या कारने पाठीमागून धडक दिल्याचं दिसून येत आहे. ज्या कारने पाठीमागून धडक दिली, त्या कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. तर रुबीनाच्या कारचा पाठचा भाग बराच डॅमेज झाला आहे. अभिनव आणि रुबिनाच्या या ट्विटवर मुंबई ट्रॅफिक पोलिसांनीही ट्विट केलं आहे. ‘ज्याठिकाणी दुर्घटना घडली आहे, तिथल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये घटनेची तक्रार नोंदवा’, असं त्यांनी म्हटलंय.

रुबिना आणि अभिनवने 2018 मध्ये लग्न केलं. या दोघांनी बिग बॉसच्या 14 व्या पर्वात स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. ऑक्टोबर 2020 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत हा शो सुरू होता. या सिझनची विजेती रुबिना ठरली होती. राहुल वैद्य, निक्की तांबोळी आणि अली गोणी यांचा पराभव करत रुबिनाने विजेतेपद पटकावलं होतं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.