Disha Patani | रूमर्ड बॉयफ्रेंडने दिले दिशा पटानी हिला अत्यंत मोठे गिफ्ट, थेट आपल्या हातावरच अभिनेत्रीचा…
दिशा पटानी ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. दिशा पटानी ही टायगर श्रॉफ याला डेट करत होती. मात्र, अचानक यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू झाल्या. टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्या ब्रेकअपमुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या चित्रपटांपेक्षा अधिक पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. काही वर्षे दिशा पटानी ही बाॅलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याला डेट करताना दिसली होती. इतकेच नाही तर दिशा पटानी ही थेट टायगर श्रॉफ याच्या कुटुंबियांसोबतही स्पाॅट झाली होती. अनेकदा पार्ट्यांमध्येही एकसोबत टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी हे सहभागी होत होते. मुंबईमध्ये अनेकदा हे डिनर डेला देखील स्पाॅट झाले. चाहत्यांना टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांची जोडी प्रचंड आवडत असे.
टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्या लग्नाची चाहते वाट देखील बघत होते. मात्र, काही दिवसांपूर्वीच हे स्पष्ट झाले की, टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांचे ब्रेकअप झाले. मात्र, यांचे ब्रेकअप नेमके कोणत्या कारणाने झाले हे अजूनही कळू शकले नाही. टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्या ब्रेकअपच्या चर्चांनंतर चाहतेही चांगलेच हैराण झाले.
टायगर श्रॉफ याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर दिशा पटानी ही सायबेरियन मॉडल अलेक्जेंडर एलेक्स इलिक याला डेट करत असल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नाही तर अनेकदा दिशा पटानी आणि अलेक्जेंडर स्पाॅट देखील होतात. मात्र, अजूनही दिशा पटानी हिने तिच्या आणि अलेक्जेंडर यांच्या नात्यावर काहीच भाष्य केले नाहीये.
नुकताच दिशा पटानी हिने इंस्टा स्टोरीवर काही अत्यंत खास फोटो हे शेअर केले आहेत. हे फोटो पाहून आता अलेक्जेंडर यालाच दिशा पटानी ही डेट करत असल्याचे स्पष्ट होताना दिसत आहे. कारण अलेक्जेंडर याने चक्क दिशा पटानी हिच्या चेहऱ्याचा टॅटू आपल्या हातावर काढला आहे. हा टॅटू पाहून आता विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.
अलेक्जेंडर याच्या हातावरील टॅटूचेच फोटो हे दिशा पटानी हिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामुळे आता यांच्या अफेअरच्या चर्चा या जोरदार रंगताना दिसत आहेत. अलेक्जेंडर याने काढलेल्या टॅटूमध्ये दिशा पटानी हिचा चेहरा जबरदस्त असा दिसत आहे. चाहत्यांना देखील हा टॅटू प्रचंड आवडल्याचे दिसत आहे.
या टॅटूवरून हे स्पष्ट होते की, अलेक्जेंडर हा दिशा पटानी हिच्यावर किती जास्त प्रेम करतो. दिशा पटानी ही गेल्या काही दिवसांपूर्वीच माैनी राॅय हिच्यासोबत विदेशात धमाल करताना दिसली होती. विशेष म्हणजे अत्यंत खास फोटो शेअर करताना दिशा पटानी ही दिसली होती. माैनी राॅय आणि दिशा पटानी या खूप चांगल्या मैत्रीणी आहेत.