नताशा गायब झाल्यानंतर रशियन मॉडलला हार्दिकची आठवण, म्हणाली…
Russian Model on Hardik Pandya: प्रसिद्ध रशियन महिलेकडून हार्दिक पांड्यासाठी खास शब्द... क्रिकेटपटूच्या पत्नीने धरलंय मौन, पण 'ही' रशियन महिला मात्र..., सोशल मीडियावर हार्दिक पांड्या आणि रशियन महिलेचे फोटो देखील तुफान व्हायरल, चर्चांना उधाण...
भारतीय क्रिकेट संघातील ऑलराऊंडर क्रिकेटपटू हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसांपासून खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेवर मिळवलेल्या विजयात ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने महत्त्वाची भूमिका बजावली. हार्दिकने फायनल मॅचमध्ये गोलंदाजीत जबरदस्त प्रदर्शन केलं. भारतीय संघाचा विजय झाल्यानंतर संपूर्ण देशाने आणि क्रिकेटपटूंच्या कुटुंबियांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. पण हार्दिक पांड्या याच्या पत्नीने कोणालाच शुभेच्छा दिल्या नाहीत. यामुळे पुन्हा हार्दिक आणि नताशा यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
हार्दिक पांड्या याला पत्नी नताशा हिने शुभेच्छा दिल्या नाहीत. पण एका प्रसिद्ध रशियन मॉडेलने भारतीय क्रिकेट संघाचं आणि हार्दिक पांड्याचं कौतुक केलं आहे. हार्दिक पांड्या याचं कौतुक करणारी रशियन मॉडेल दुसरी तिसरी कोणी नसून इलेना टुटेजा आहे.
View this post on Instagram
इलेना टुटेजा हिने हार्दिक याच्यासोबत एका जाहिरातीचं शूट केलं होतं. त्याच शुटिंगचे फोटो पोस्ट करत इलेना टुटेजा हिने हार्दिक याचे कौतुक केलं आहे. शिवाय इलेना टुटेजा हिने भारतीय क्रिकेटसंघाला देखील शुभेच्छा देखील दिल्या आहेत. इलेना टुटेजा म्हणाली, ‘हार्दित तू फक्त भारतीय संघाची नाही तर, आमची मान देखली गर्वाने उंच केली आहे…’ सध्या सर्वत्र इलेना टुटेजा हिच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे.
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक यांचं नातं
गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. विजयी होऊन घरी परतल्यानंतर देखील हार्दिक याचं स्वागत फक्त त्याच्या मुलाने केलं. तेव्हा देखील नताशा पती आणि मुलासोबत नव्हती. ज्यामुळे नताशा हिला ट्रोल देखील करण्यात आलं.
सांगायचं झालं तर, अद्याप नताशा – हार्दिक याने त्यांच्या नात्यावर अधिकृत घोषणा केली नाही. त्यामुळे नताशा – हार्दिक खरंच घटस्फोट घेणार आहेत की नाही… हे देखील स्पष्ट झालेलं नाही. पण नताशा कायम सोशल मीडियावर क्रिप्टिक पोस्ट करत असते. ज्यामुळे घटस्फोटाच्या चर्चा आणखी जोर धरतात.
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक यांचं लग्न
हार्दिक – नताशा यांनी जानेवारी 2020 मध्ये दोघांनी साखरपुडा केला. त्यानंतर मे 2020 नताशा – हार्दिक यांनी कोर्ट मॅरिज केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. दोघांना एक मुलगा देखील आहे. नताशा – हार्दिक यांच्या मुलाचं नाव अगस्त्य असं आहे.