‘साथ निभाना साथिया’ फेम अभिनेत्रीचं निधन, टीव्ही विश्वावर शोककळा
Saath Nibhaana Saathiya : धक्कादायक.... 'साथ निभाना साथिया' फेम अभिनेत्रीने घेतला अखेरचा श्वास, मृत्यूचं कारण अद्यार अस्पष्ट.. एकेकाळी 'साथ निभाना साथिया' मालिकेच्या माध्यमातून केलं होतं चाहत्यांचं मनोरंजन... आज निधनाची बातमी समोर येताच सर्वत्र दुःखाचं वातावरण
मुंबई | 5 नोव्हेंबर 2023 | टीव्ही विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ‘साथ निभाना साथिया’ मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीचं निधन झालं आहे. ज्यामुळे टीव्ही विश्वावर शोककळा पसरली आहे. ‘साथ निभाना साथिया’ मालिकेतील अभिनेत्री अपर्णा काणेकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अपर्णा काणेकर यांच्या निधनानंतर ‘साथ निभाना साथिया’ मालिकेतील प्रत्येक कलाकाराला मोठा धक्का बसला आहे. अपर्णा काणेकर यांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. एवढंच नाही तर, सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते त्यांना श्रद्धांजली देत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अपर्णा काणेकर यांच्या निधनाची चर्चा रंगलेली आहे.
अपर्णा काणेकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी ‘साथ निभाना साथिया’ मालिकेत जानकी बा मोदी या भूमिकेला न्याय दिला. ज्यामुळे त्यांना एक नवी ओळख मिळाली होती. मालिकेतील प्रत्येक व्यक्तीवर अपर्णा काणेकर प्रचंड प्रेम करायच्या. म्हणून त्यांच्या निधनानंतर अनेकांना मोठा धक्का बसला आहे.
View this post on Instagram
अपर्णा काणेकर यांच्या निधनाची माहिती मालिकेतील अभिनेत्री लवली ससान हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. लवली ससान हिने अपर्णा काणेकर यांच्यासोबत फोटो पोस्ट केल्यामुळे त्यांच्या निधनाची माहिती समोर आली. अभिनेत्रीच्या पोस्टवर अनेकांना कमेंट करत दुःख व्यक्त केलं आहे.
अपर्णा काणेकर यांच्यासोबत खास फोटो पोस्ट करत लवली भावना व्यक्त करत म्हणाली, ‘मला आज प्रचंड वाईट वाटत आहे. कारण माझ्या आयुष्यातील एका खास व्यक्तीचं आणि एका खऱ्या योद्धाचं निधन झालं आहे. आपण सेटवर एकत्र राहिलो आणि आपल्यात एख छान नातं तयार झालं…यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. तुमची कायम आठवण येईल…’ असं देखील लवली म्हणाली.
लवली हिनेच नाही तर, अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी देखील अपर्णा काणेकर यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त केलं आहे. अपर्णा काणेकर यांच्या निधनानंतर टीव्ही विश्वाचं मोठं नुकसान झालंय..असं म्हणायला हरकत नाही. अपर्णा काणेकर यांच्या निधनाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही, पण चाहते आणि अनेक सेलिब्रिटींनी अपर्णा काणेकर यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त केलं आहे.