सबा आझाद आणि ऋतिक रोशन यांची विदेशात धमाल, फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनी लावला क्लास
सबा आझाद आणि ऋतिक रोशन यांची जोडी गेल्या काही दिवसांपासून जोरदार धमाका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे यांच्या लग्नाची जोरदार चर्चा देखील सुरू होती. यंदाच सबा आझाद आणि ऋतिक रोशन यांचे लग्न मुंबईमध्ये पार पडणार असल्याचे एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.
मुंबई : ऋतिक रोशन आणि सबा आझाद (Saba Azad) हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या रिलेशनशिपमुळे जोरदार चर्चेत आहेत. ऋतिक रोशन आणि सबा आझाद हे एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, अनेकांना ऋतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सबा आझाद यांची जोडी अजिबातच आवडत नाही. इतकेच नाही तर यांच्या जोडीला नेहमीच सोशल मीडियावर टार्गेट देखील केले जाते. बरेच लोक ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांची जोडी बघितली की, मुलगी आणि बापाची जोडी असल्याचे देखील म्हणतात. काही दिवसांपूर्वीच ऋतिक रोशन यांच्या वाढदिवसानिमित्त सबा आझाद हिने सोशल मीडियावर (Social media) एक खास पोस्ट शेअर केली होती. विशेष म्हणजे दोघांचा एक स्पेशल सेल्फी देखील शेअर केला होता.
ऋतिक रोशन आणि सबा आझाद हे दोघेही एकमेकांसोबत चांगला वेळ घालवताना दिसतात. इतकेच नाही तर नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ऋतिक रोशन आणि सबा आझाद हे विदेशात गेले होते. विशेष म्हणजे यावेळी ऋतिक रोशन याचे दोन्ही मुले सोबत होती. यावेळी विदेशातील काही खास फोटो शेअर करताना सबा आझाद ही दिसली होती.
नुकताच आता सबा आझाद हिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे. आता या पोस्टमुळे सबा आझाद ही चर्चेत आलीये. विशेष म्हणजे या पोस्ट सोबत सबा हिने खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ऋतिक रोशन हा दिसत आहे. ऋतिक रोशन आणि सबा आझाद हे सध्या विदेशामध्ये सुट्ट्या घालवताना दिसत आहेत.
सबा आझाद हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये एका हाॅटेलमध्ये बसलेला ऋतिक रोशन हा दिसतोय. विशेष म्हणजे यावेळी खास लूकमध्ये ऋतिक रोशन दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये ऋतिक रोशन आणि सबा आझाद हे दिसत असून त्यांनी सेल्फी घेतला आहे. या फोटोमध्ये दोघेही खूप जास्त आनंदी दिसत आहेत.
हे फोटो शेअर करत सबा आझाद हिने लिहिले की, माय हिप्पो हार्ट…आता सबा आझाद हिने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकजण या पोस्टवर कमेंट करत सबा आणि ऋतिक रोशन यांना टार्गेट करत आहेत. काही दिवसांपूर्वीच एक चर्चा जोरदार रंगली होती की, ऋतिक रोशन आणि सबा आझाद हे लवकरच लग्न करणार आहेत.