Sachin Pilgaonkar यांच्या आईनेच लेकाच्या मनात पेरलं प्रेमाचं बीज; सुप्रिया यांना केलं प्रपोज आणि…
सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळवगावकर यांची भन्नाट 'लव्हस्टोरी', 'सुप्रिया परफेक्ट मुलगी आहे...', सचिन यांच्या आईनेच लेकाच्या मनात रोवलं प्रेमाचं बीज
मुंबई : अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री सु्प्रिया पिळगावकर यांनी आपल्या अभिनयाने कित्येक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आज देखील त्यांच्याबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. सुप्रिया आणि सचिन यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात घर केलं. सुप्रिया आणि सचिन यांनी फक्त मराठी सिनेविश्वातच नाही तर, बॉलिवूडमध्ये देखील अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. सुप्रिया आणि सचिन नुकताच विनोदवीर याच्या ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये मुलगी श्रिया पिळगावकर हिच्यासोबत पोहोचले होते. यावेळी सुप्रिया आणि सचिन यांनी त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. शिवाय सुप्रिया आणि सचिन यांनी अनेक जुन्या आठवणी ताज्या देखील केल्या.
सुप्रिया आणि सचिन यांच्या वैवाहिक आयुष्याला ३८ वर्ष झाली आहेत. सुप्रिया आणि सचिन आज सुखी आणि आनंदी आयुष्य जगत आहेत. आज आपण त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल जाणून घेवू. सचिन पिळगावकर यांनी कसं प्रपोज केल.. याबद्दल सुप्रिया यांनी ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये सांगितलं. सध्या सर्वत्र सुप्रिया आणि सचिन यांच्या लव्हस्टोरीची चर्चा रंगत आहे.
सुप्रिया पिळगावकर म्हणाल्या, ‘सचिन त्यांच्या ‘नवरी मिळे नवऱ्याला’ सिनेमासाठी लिड अभिनेत्रीच्या शोधात होते. तेव्हा दुरर्शनवर त्यांच्या आईने मला पाहिलं आणि सिनेमात मला कास्ट करण्याचा सल्ला सचिन यांच्या आईने त्यांना दिला. सचिन यांना ‘नवरी मिळे नवऱ्याला’ सिनेमा बनवायचा होता. पण त्यासाठी त्यांना अनेक कष्ट करावे लागले.’
सुप्रिया पुढे म्हणाल्या, ‘सिनेमासाठी अभिनेत्री शोधणं सचिन यांच्यासाठी कठीण झालं होतं. म्हणून त्यांनी सर्वांवर सिनेमासाठी अभिनेत्री शोधण्यासाठी सांगितलं. तेव्हा दुरर्शनवर प्रदर्शित होणाऱ्या एका छोट्या कार्यक्रमात काम करत होती. तेव्हा कार्यक्रमात माझ्या सासूबाईंनी मला पाहिलं आणि सिनेमात लिड अभिनेत्री म्हणून मी परफेक्ट आहे असं सचिन यांना सांगितलं.’
‘त्यांनी माझा शो पाहिला. त्यानंतर त्यांना कळालं की मी गोव्याची आहे. तेव्हा सासूबाईंनी सचिन यांना सल्ला दिला की, मी सचिन यांच्यासाठी परफेक्ट आहे. आईनेच लेकाच्या मनात प्रेमाचं बीज पेरलं.’ सचिन यांनी कधी प्रेम व्यक्त केलं हे देखील सुप्रिया पिळगावकर यांनी सांगितलं.
‘सिनेमाच्या निर्मितीदरम्यान काहीही झालं नाही. सिनेमाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर सचिन यांनी मला प्रपोज केलं. सिनेमाच्या शूटिंगदरम्यानच प्रपोज केल्याने मी त्यांना नकार दिल्यास सिनेमाचं काय होईल, अशी भीती सचिन यांना वाटत होती. पण नंतर त्यांनी मला प्रपोज केलं आणि मी हो म्हणाले….’ सुप्रिया आणि सचिन कायम चाहत्यांना कपल गोल्स देखील देत असतात.