Sachin Tendulkar यांची एक पोस्ट आणि आमिर खानची दुसरी पत्नी होणार मालामाल, काय आहे प्रकरण?

Sachin Tendulkar | सचिन तेंडुलकर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतात चर्चेत... आता देखील क्रिकेटचे देव एका महत्त्वाच्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. सचिन तेंडुलकर यांनी सोशल मीडियावर अशी एक पोस्ट केली आहे, ज्यामुळे आमिर खान आणि अभिनेत्याची दुसरी पत्नी किरण राव यांना मोठा फायदा होणार आहे...

Sachin Tendulkar यांची एक पोस्ट आणि आमिर खानची दुसरी पत्नी होणार मालामाल, काय आहे प्रकरण?
Follow us
| Updated on: Mar 12, 2024 | 9:09 AM

मुंबई | 12 मार्च 2024 : झगमगत्या विश्वात सेलिब्रिटी कायम एकमेकांच्या मदतीसाठी पुढे येताना दिसतात. आता क्रिकेटचे देव आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सचिन तेंडुलकर यांनी अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांचं सोशल मीडियाच्या माध्यमातून कौतुक केलं आहे. अशात तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, नक्की झालंय तरी काय? नुकताच किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडिज’ सिनेमा प्रदर्शित झाला आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करताना दिसत आहे.

‘लापता लेडिज’ सिनेमाची कथा आणि बॉक्स ऑफिस कलेक्शनने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. अनेक चाहते आणि सेलिब्रिटी ‘लापता लेडिज’ सिनेमाचं कौतुक करताना दिसत आहे. पण सचिन यांनी सिनेमाचं कौतुक केल्यानंतर चाहत्यांनी देखील त्यांना पाठिंबा दिला आहे.

हे सुद्धा वाचा

एक्स (ट्विटर) वर ‘लापता लेडिज’ सिनेमासाठी सचिन तेंडुलकर यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ‘मनावर राज्य करणारा सिनेमा ज्याचा सेट भारतातील एक छोट्या शहरात लागला आहे. सिनेमा वेग-वेगळ्या टप्प्यांवर प्रेक्षकांसोबत संवाद साधत आहे. मला ‘लापता लेडिज’ सिनेमा प्रचंड आवडला आहे.’

सचिन तेंडुलकर पुढे म्हणाले, ‘मनाला भिडणारी सिनेमाची कथा… सिनेमातील साधेपणा मला प्रचंड आवडलाय… अत्यंत शांतपणे सिनेमाने समाजाला एक वेगळा सोशल मेसेज दिला आहे… सिनेमा सर्वांनी नक्की पाहायला हवा…’

‘सिनेमा पाहिल्यानंतर तुम्हाला हसू, रडू सर्वकाही येईल… प्रेक्षक नक्कीच सिनेमाचा आनंद घेतील… माझे मित्र आमिर खान आणि किरण राव यांनी शुभेच्छा…’ सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त सचिन तेंडुलकर यांच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

चाहते देखील सचिन तेंडुलकर यांच्या पोस्ट यांच्या पोस्टवर कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. अनेक नेटकरी कमेंट करत म्हणाले, ‘सर तुम्ही बोल आहात म्हणून आम्ही सिनेमा नक्की पाहू…’ दरम्यान, सचिन यांच्या सोशल मीडिया पोस्टनंतर किरण राव यांचा ‘लापता लेडिज’ किती कोटी रुपयांची कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘लापता लेडिज’ सिनेमातील कलाकार…

आमिर खानच्या प्रॉडक्शनखाली बनलेला ‘लापता लेडीज’ सिनेमा 1 मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. सिनेमाचं दिग्दर्शन किरण राव हिने केलं आहे. सिनेमात अभिनेता रवी किशन याच्यासोबत नीतांशी गोयल, प्रतिभा रंता, छाया कदम, नीतांशी गोयल यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त 5 लाख रुपयांच्या बजेटमध्ये सिनेमा तयार करण्यात आा आहे. प्रदर्शनानंतर सिनेमाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर 7 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सिनेमाची सर्वत्र चर्चा रंगत आहे. त्यामुळे सिनेमा किती कोटीपर्यंत मजल मारेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुपलं, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुपलं, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....