Video : अपघातानंतर पहिल्यांदाच समोर आला सहदेव दिरदो, ‘बचपन का प्यार’ फेम कलाकारानं काय म्हटलं, पाहा…

'बचपन का प्यार' (Bachpan Ka Pyaar) या गाण्यानं लोकप्रिय झालेल्या छत्तीसगडमधल्या सहदेव दिरदो (Sahdev Dirdo) याचा 28 डिसेंबरला अपघात झाला होता. आता त्याचा एक नवीन व्हिडिओ (Video) सोशल मीडिया(Social Media)वर समोर आलाय.

Video : अपघातानंतर पहिल्यांदाच समोर आला सहदेव दिरदो, 'बचपन का प्यार' फेम कलाकारानं काय म्हटलं, पाहा...
सहदेव दिरदो
Follow us
| Updated on: Jan 13, 2022 | 1:33 PM

‘बचपन का प्यार’ (Bachpan Ka Pyaar) या गाण्यानं रातोरात लोकप्रिय झालेल्या छत्तीसगडमधल्या सहदेव दिरदो (Sahdev Dirdo) याचा 28 डिसेंबरला अपघात झाला होता. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. डोक्याला मार लागल्यानं तो बेशुद्ध झाला होता. ही बातमी सोशल मीडिया(Social Media)वर येताच यूझर्सनी त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. आता आनंदाची बातमी म्हणजे, सहदेव पुन्हा आपल्या पायावर उभा राहिलाय. त्याचा एक नवीन व्हिडिओ (Video) सोशल मीडिया(Social Media)वर समोर आलाय, यामध्ये त्यानं त्याच्या प्रकृतीची माहिती दिलीय. यासोबतच त्यानं डॉक्टर आणि नेटकऱ्यांचे आभार मानलेत.

नेटकऱ्यांचे मानले आभार

सहदेवनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय, यामध्ये तो हात जोडून डॉक्टर आणि नेटकऱ्यांचे आभार मानताना दिसतोय. आता बरा असल्याचं सांगताना तो दिसतोय. व्हिडिओ शेअर करताना सहदेवनं कॅप्शनमध्ये लिहिलंय, की माझ्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल आणि मला शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार.

‘आता पूर्णपणे बरा झालो आहे’

व्हिडिओमध्ये सहदेव ‘नमस्कार, मी सहदेव, मी आता पूर्णपणे बरा झालो आहे’ असं म्हणताना दिसतोय. तुम्ही माझ्यासाठी केलेल्या प्रार्थनेबद्दल सर्वांचे आभार, डॉक्टर आणि कर्मचारी यांचे खूप खूप आभार, धन्यवाद.” सहदेवच्या या पोस्टवर रॅपर बादशाहनंही कमेंट केलीय. याशिवाय सोशल मीडिया यूझर्सही बरा झाल्याबद्दल आपापल्या परीनं आनंद व्यक्त करत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल गाण्याची चर्चा

गेल्या वर्षी जुलैमध्ये 10 वर्षांच्या सहदेवच्या ‘बचपन का प्यार’ या गाण्याचा व्हिडिओ इंटरनेटवर आला होता. यानंतर रॅपर बादशाहनं याचं रिमिक्स व्हर्जन तयार केलं आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट केलं. तेव्हापासून सोशल मीडियावर या व्हायरल गाण्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर ऑगस्टमध्ये सहयोगसोबत त्याचा संपूर्ण रिमिक्स व्हिडिओ बनवला.

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही केलंय कौतुक

सहदेवनं वेगळ्या शैलीत गायलेलं हे गाणं सोशल मीडियावर इतकं हिट झालं, की ते रातोरात इंटरनेट सेन्सेशन बनलं. त्याचाच परिणाम छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनीही सहदेवकडून हे गाणं ऐकलं. एवढंच नाही, तर या टॅलेंटला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी त्याचा व्हिडिओही ट्विटर अकाउंटवर शेअर केला.

Viral : 100हून जास्त भुसुरूंग शोधण्यास मदत करणाऱ्या कंबोडियातल्या मगावा उंदराचा मृत्यू, वाचा सविस्तर

Viral Video in Gym : जिममध्ये करत होता चुकीच्या पद्धतीनं व्यायाम, नंतर घडतं असं काही…

आनंद महिंद्रा यांनी अलिबागमधल्या सूर्यास्ताचा सुंदर फोटो केला ट्विट, नेटिझन्सनीही Share केले अप्रतिम Photos

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.