Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सई मांजरेकर पुन्हा चर्चेत, निर्मात्याच्या मुलाला करते डेट, दोघांचाही फोटो काढायला विरोध

ई मांजरेकरने प्रभुदेवाच्या दबंग 3 या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्या चित्रपटात सई सलमान खान (samlman khan) सोबत मुख्यभूमिकेत दिसली होती. काल सांयकाळी हे जोडपे एकत्र दिसले होते. परंतु फोटो ग्राफर्सना एकत्र फोटो काढू नका असं दोघांनी सांगितल्याचं वृत्त आहे.

सई मांजरेकर पुन्हा चर्चेत, निर्मात्याच्या मुलाला करते डेट, दोघांचाही फोटो काढायला विरोध
सई मांजरेकर
Follow us
| Updated on: Jan 28, 2022 | 6:24 PM

मुंबई – डायरेक्टर महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या मुलीची सद्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये (bollywood industry) असल्याची अधिक चर्चा आहे. बॉलिवूडमधील अनेक जणांच्या वेगवेगळया कारणासाठी चर्चा केल्या जातात. परंतु सई मांजरेकर (Saiee Manjrekar) तिच्या सद्या सुरू असलेल्या रिलेशनच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, साई साजिद नाडियादवालाचा मुलगा सुभान नाडियाडवालाला डेट करत आहे. हे जोडपे अनेकदा लंच आणि डिनर डेटवर एकत्र दिसले आहे. दोघांनी फोटोग्राफर्सना एकत्र फोटो क्लिक करू नका असे सांगितले आहे. सई मांजरेकरने प्रभुदेवाच्या दबंग 3 या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्या चित्रपटात सई सलमान खान (samlman khan) सोबत मुख्यभूमिकेत दिसली होती. काल सांयकाळी हे जोडपे एकत्र दिसले होते. परंतु फोटो ग्राफर्सना एकत्र फोटो काढू नका असं दोघांनी सांगितल्याचं वृत्त आहे.

दोघांची एकत्र फोटो काढण्यास मनाई 

दोघांनीही एकत्र फोटो काढण्यास फोटोग्राफर्सना मनाई केली आहे. सुरूवातीला सुभानने आपल्या अंदाजात कॅमे-या समोर पोज दिली. त्यानंतर शेजारी असलेल्या लाल रंगाच्या गाडीतून तो निघून गेला. त्यांच्यानंतर सई मांजरेकर तिथे दिसली. परंतु तिने एकत्र फोटो देण्यास नकार दिला. सई आणि सुभान आपल्या सुरूवातीच्या नात्यामध्ये असल्याचे रिपोर्ट मध्ये म्हणटले आहे. दोघांनाही एकमेकांसोबत वेळ घालवायला आवडतोय. त्यांचं नातं घट्ट झाल्यानंतर दोघेही आपल्या प्रेमाची कबुली जाहीर देतील.

तिच्या योग्य रोल असले तर नक्की देईन 

महेश मांजरेकर यांनी ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत दबंग 3 मधील आपल्या मुलीची अॅक्टिंग पसंत पडली नसल्याचे त्यांनी सांगितले होते. ही गोष्ट सईला एका ज्येष्ठ अभिनेत्याने सुध्दा सांगितली असल्याचे महेश मांजरेकरांनी मुलाखतीत सांगितले होते. माझ्याकडं समजा चांगला रोल निघाला, तर मला वाटलं की ती माझ्या त्या रोलसाठी परफेक्ट आहे. किंवा तिच्याशिवाय तो रोल कोणीचं करू शकत नाही असं मला ज्यावेळी वाटेल तेव्हा मी तीला तो रोल नक्की देईल.

मेजर चित्रपटात दिसणार 

मेजर चित्रपटात सुध्दा सई मांजरेकर मुख्य भूमिकेत दिसणार असून हा चित्रपट संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित आहे. सई मांजरेकर सोशल मीडियाच्या अकाऊंटवरती प्रचंड अॅक्टिव्ह असते. ती सद्या सुभान सोबत वारंवार दिसत असल्याने तिच्याबाबतच्या चर्चा अधिक वाढल्या आहेत. हे कपल नवीन असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. त्यामुळे ते पब्लिसीटीला घाबरतं आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या ड्रग तस्कर शेजाऱ्याला एनसीबीकडून अटक, तब्बल 8 महिन्यांनंतर एसीबीच्या जाळ्यात

मिस्टर अॅण्ड मिसेस चांदकरांची वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, कलाकारांच्या नजरेतून करूयात जंगल सफारी

काखेतील केसांचा फोटो शेअर करत अभिनेत्री तिलोत्तमा म्हणते, ‘मी माफी मागणार नाही म्हणजे नाही!

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?.
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्....
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.