घटस्फोटानंतर सई ताम्हणकरचं कसं आहे एक्स पतीसोबत नातं? अनेक वर्षानंतर म्हणाली…
Sai Tamhankar on Divorce: ' व्यक्तीने आपल्याला दिलेले क्षण...', घटस्फोटानंतर चांगल्या - वाईट आठवणींबद्दल सई ताम्हणकरने अखेर सोडलं मौन, आता एक्स पतीसोबत कसं आहे अभिनेत्रीचं नातं? सर्वत्र सईची चर्चा...

Sai Tamhankar on Divorce: झगमगत्या विश्वात प्रेम, लग्न आणि त्यानंतर घटस्फोट… ही सामान्य गोष्ट झालेली आहे. अनेक सेलिब्रिटींनी जोडीदाराला डेट केल्यानंतर लग्न केलं. पण त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. असंच काही मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्यासोबत देखील झालं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कायम फक्त प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असणारी सई आता खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सई हिने तिच्या घटस्फोटाबद्दल मोठं वक्तव्य केलेलं आहे.
घटस्फोटानंतर एक्स पतीसोबत कसं आहे सईचं नातं?
सई ताम्हणकर हिच्या एक्स पतीचं नाव अमेय गोसावी असं आहे. लग्नाच्या दोन वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पण घटस्फोटानंतर देखील सई आणि अमेय एकमेकांचे चांगले मित्र आहेत…. असं खुद्द सई हिने मुलाखतीत सांगितलं. शिवाय घटस्फोटानंतरच्या भेटीबद्दल देखील अभिनेत्रीने सांगितलं.
सई आणि अमेय यांनी 2013 मध्ये लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोघांसाठी घटस्फोटाचा निर्णय कठीण असला तरी, एकमेकांचा विचार करत वेगळ होण्याच्या मार्ग त्यांनी स्वीकारला आणि मैत्री कशी टिकवता येईल याचा विचार केला.
सई म्हणाली, घटस्फोट झाल्यानंतर काही काळ ‘सई ताम्हणकर गोसावी’ असंच मला माझं नाव ऐकायला येत होतं. अखेर काही दिवसांनी ग्प्पा मारायचं ठरलं आणि दोन ड्रिंक्स घेतल्या. भेटीत जुन्या चांगल्या – वाईट आठवणी ताज्या झाल्या. हसू – रडू आणि जीवनाबद्दलचे दोघांनी एकमेकांना सल्ले दिले.’
‘त्यानंतर हळूहळू आमच्या काही मित्रांनी देखील आम्हाला जॉइन केलं. त्या रात्री आम्ही चांगला वेळ घालवला…’ असं देखील सई म्हणाली. एवढंच नाही तर, यावेळी सईने टॅटूबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे.
घटस्फोटानंतर देखील सई हिने लग्नाचा आणि प्रपोजल दिवसाचा टॅटू ठेवला आहे. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘एक वेळ येतो आणि काही नाही संपतात. पण त्या व्यक्तीने आपल्याला दिलेले क्षण कायम स्मरणात राहतात. त्यामुळे ते क्षण विसरण्याची गरज मला वाटत नाही…’ असं देखील सई म्हणाली.