Video: सई ताम्हणकरने समीर चौघुलेला केले किस, ‘चल जाऊ डेटवर’ गाण्याची विशेष चर्चा
सध्या सोशल मीडियावर एक गाणे चर्चेत आहे. या गाण्यात सई ताम्हणकर आणि समीर चौघुले यांचा रोमँन्स पाहायला मिळत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीमधील सर्वांची आवडती आणि लाडकी अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर ओळखली जाते. सईने अभिनयाच्या जोरावर मराठीसह बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये देखील स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. सध्या सोशल मीडियावर सईचा एका व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सईसोबत महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील विनोदवीर, समीर चौघुले दिसत आहे. दोघांचा हा रोमँटिक व्हिडीओ सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेताना दिसत आहे. दरम्यान, या व्हिडीओमध्ये सईने समीर चौघुलेला किस केल्यामुळे विशेष चर्चा रंगली आहे.
काय आहे व्हिडीओ?
सई आणि समीरचा व्हायरल होणारा व्हिडीओ ‘गुलकंद’ या चित्रपटातील ‘चल जाऊ डेटवर’ हे गाणे आहे. या गाण्यामध्ये सई आणि समीरची भन्नाट केमिस्ट्री दिसत आहे. सईचा लूक चाहत्यांना घायाळ करणारा आहे. गाण्यात सई समीरच्या गालावर किस करते. दोघांचे हे रोमँटिक गाणे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हे गाणं ऐकायला जितकं छान आहे, तितकंच त्याचं सादरीकरणही अप्रतिम आहे. वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते यांच्या कमाल आवाजातील या गाण्याला प्रशांत मडपूवार यांच्या शब्दांची व अविनाश विश्वजीत यांच्या जबरदस्त संगीताची जोड लाभली आहे.
वाचा: 24व्या वर्षी लग्न, २७व्या वर्षी विधवा; कोण आहे स्मिता पाटीलची भाची?
‘गुलकंद’ या चित्रपटात सई आणि समीर पती पत्नी दाखवले आहेत. सुरुवातीला सई ही थोड्या वेगळ्या अंदाजात दिसत आहे. साध्या, सरळ बायकोच्या लूकमध्ये सई दिसत आहे. पण नंतर अचानक सईचा मेकओव्हर दाखवण्यात आला आहे. त्यामुळे ढवळे फॅमिली कुठे आणि कशी डेटवर जाणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आहेत.
‘गुलकंद’ चित्रपटाविषयी
‘गुलकंद’ या चित्रपटात सई ताम्हणकरसोबत समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे यांसारखे तगडे कलाकार आहेत. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन गोस्वामी यांनी केले आहे तर लेखन सचिन मोटे यांनी केले आहे. हा चित्रपट १ मे २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.