मंबई : बॉलिवूडचं स्टार कपल म्हणजे अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर खान कायम त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात करीना कायम सोशल मीडियावर सैफ आणि दोन मुलांसोबत फोटो पोस्ट करत असते. करीना आणि सैफ यांनी कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता, त्यांच्या भावनांना अधिक महत्त्व दिलं आणि लग्न बंधनात अडकले. लग्नानंतर बेबो पती सैफ आणि मुलं तैमूर, जेह यांच्या सोबत खासगी आयुष्याचा आनंद घेताना दिसते. अनेक महत्त्वाच्या ठिकाणी सैफ – करीना त्यांच्या दोन चिमुकल्यांसोबत दिसतात.
जेव्हा चाहते सैफ – करीना एकत्र पाहतात तेव्हा दोघांवरून कोणाची नजर हटत नाही. चाहत्यांना कपल्स गोल देणाऱ्या रॉयल कपलला एक चूक मात्र आता महागात पडली आहे. ज्यामुळे दोघांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. सध्या करीना आणि सैफचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
करीना – सैफ त्यांच्या कारमधून घराबाहेर पडले. सैफ कार चालवत होता. याचदरम्यान, फोटोग्राफर्सने दोघांना कॅमेऱ्यात कैद केलं. जेव्हा दोघे कारमधून घराबाहेर पडले, तेव्हा फोटोग्राफर्सने दोघांचा व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली. सध्या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये करीना ‘नो मेकअप लूक’ मध्ये दिसत आहे. पण जोडी बाहेर पाडल्यानंतर एक चूक दोघांना नडली आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर नेटकरी दोघांना ट्रोल करत आहेत. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या लक्षात आलं सैफ – करीना यांनी कारमध्ये बसल्यानंतर सीटबेल्ट लावलेला नाही. ज्यामुळे दोघांना ट्रोल करण्यात येत आहे.
करीना – सैफच्या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत म्हणाले, ‘सीट बेल्ड का नाही?’, तर अन्य एक युजर म्हणला, ‘आराम करा…. नियम फक्त सर्वसामान्य जनतेसाठी…’ अशा अनेक टीका करणाऱ्या कमेंट सैफ आणि करीनाच्या व्हिडीओवर नेटकरी करत आहेत.
करीनाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच दिग्दर्शक सुभाष घोष यांच्या थ्रिलर सिनेमात दिसणार आहे. करीनाचा आगामी सिनेमा ‘डिवोशन ऑफ सस्पेक्ट एक्स’ या पुस्तकावर आधारलेला आहे. सिनेमात करीनासोबत विजय वर्मा आणि जयदीप अहलावत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर दुसरीकडे सैफ ‘आदिपुरुष’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात प्रभास आणि कृती सेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.