Saif Ali Khan Attack : नवऱ्यावर हल्ला झाला, त्या रात्रीच करीना कपूरच पहिलं फुटेज आलं समोर, VIDEO
Saif Ali Khan Attack : बॉलिवूड स्टार सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याने एकच खळबळ उडाली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास सैफवर घरातच हा हल्ला झाला. त्यावेळी पत्नी, अभिनेत्री करीना कपूर कुठे होती? त्यावेळी काय घडलं? असे अनेक प्रश्न उपस्थित होतं आहेत. आता करीना कपूरच त्या रात्रीच पहिलं फुटेज समोर आलय.
बॉलिवूडचा सुपरस्टार सैफ अली खानवर काल रात्री वांद्रे येथील राहत्या घरी चाकू हल्ला झाला. सैफ अली खान या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून त्याला वांद्र्याच्या लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलय. सैफ अली खानवर रात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. सैफ अली खानला मध्यरात्री 3.30 वाजताच्या सुमारास लिलावती रुग्णालयात आणलं गेलं. त्याच्या शरीरावर एकूण सहा जखमा होत्या. त्यापैकी दोन जखमा खोलवर झाल्या होत्या. एक जखम त्याच्या पाठीच्या कण्याजवळ होती. सैफ अली खानला रुग्णालयात आणलं, त्यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
सैफ अली खान वांद्र्याच्या सतगुरु शरण इमारतीत राहतो. 12 व्या मजल्यावर त्याचा फ्लॅट आहे. उच्चभ्रू लोकवस्तीचा हा भाग आहे. सैफचा बंगला नाहीय, मग हा चोर त्याच्या घरात कसा घुसला?. सैफच्या इमारतीत सुरक्षा व्यवस्था नाहीय का? इतक्या मोठ्या स्टारवर मध्यरात्री त्याच्या घरात कसा हल्ला होतो? असे अनेक प्रश्न या हल्ल्याने निर्माण झाले आहेत.
करीना कपूरची रात्री पार्टी का?
सैफवर ज्या व्यक्तीने हल्ला केला, ती व्यक्ती रात्रभर सैफच्या घरातच दबा धरून बसली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान आता करीना कपूरच फुटेज समोर आलय. इमारतीच्या आतमध्ये करीना कपूर काही जणांशी बोलताना दिसतेय. सैफवर हा हल्ला झाला तेव्हा करीना कपूर घरी होती का? असा प्रश्न उपस्थित विचारला जातोय. करीनाच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून तिची पार्टी सुरु असल्याचा अंदाज व्यक्त व्यक्त होत आहे. अभिनेत्री करीना कपूर खानने 8 तासांपूर्वी इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. यामध्ये एका टेबलवर काही ड्रिंक्स ठेवलेली दिसत आहेत.
View this post on Instagram
आवाज ऐकून तो बाहेर आला
हल्ल्याच्या रात्री 2 वाजता सैफला घरातील महिला कर्मचाऱ्यांचा कोणासोबत तरी वाद सुरु असल्याचं ऐकू आलं. आवाज ऐकून तो बाहेर आला. त्यावेळी हल्लेखोराशी सैफची झटापट झाली. त्याने केलेल्या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला.