छपरी डायलॉग्स, भयकंर VFX, अखेर 8 महिन्यांनंतर ‘आदिपुरुष’बद्दल काय बोलला सैफ अली खान?

प्रभासची मुख्य भूमिका असलेला ‘आदिपुरुष’ हा चित्रपट 16 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. 2023 या वर्षातील हा सर्वांत मोठा चित्रपट असल्याचं मानलं गेलं होतं. मात्र जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा त्यातील डायलॉग्स, व्हीएफएक्सची गुणवत्ता, कलाकारांचा लूक प्रेक्षकांच्या अजिबात पसंतीस पडला नाही.

छपरी डायलॉग्स, भयकंर VFX, अखेर 8 महिन्यांनंतर 'आदिपुरुष'बद्दल काय बोलला सैफ अली खान?
सैफ अली खानImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 09, 2024 | 11:48 AM

मुंबई : 9 फेब्रुवारी 2024 | गेल्या वर्षी कोट्यवधी रुपये प्रमोशनवर खर्च केल्यानंतर एक बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. तब्बल 600 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटात मोठमोठ्या सेलिब्रिटींनी भूमिका साकारल्या होत्या. मात्र जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा सोशल मीडियावर खूप मोठा वाद निर्माण झाला होता. 16 जून 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं नाव आहे ‘आदिपुरुष’. साऊथ सुपरस्टार प्रभास, कृती सनॉन, सैफ अली खान, सनी सिंह यांच्या भूमिका असलेला ‘आदिपुरुष’ जेव्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा निर्मात्यांना वाटलं होतं की हा जबरदस्त कमाई करेल. मात्र त्यातील ‘छपरी’ डायलॉग्स आणि व्हीएफएक्सने सर्वांचीच निराशा केली. या चित्रपटाची कथा ‘रामायण’वर आधारित होती. त्यातील संवाद ऐकून प्रेक्षकांना इतका राग आला की त्यांनी थेट संवादलेखक मनोज मुंतशीर यांना माफी मागण्यास भाग पाडलं होतं. आता चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या 8 महिन्यांनंतर अभिनेता सैफ अली खानने त्यावर मौन सोडलं आहे. या चित्रपटात त्याने लंकेश म्हणजेच रावणाची भूमिका साकारली होती.

‘आदिपुरुष’ या चित्रपटाने बरेच वाद निर्माण केले आणि प्रेक्षकांची प्रचंड निराशा केली. 600 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने अर्धीसुद्धा कमाई केली नव्हती. बॉक्स ऑफिसवर बंपर ओपनिंग तर झाली, मात्र चित्रपट पाहिलेल्यांनी नकारात्मक प्रचार केल्याने कमाईत मोठी घट होत गेली. ‘आदिपुरुष’च्या अपयशाबद्दल आता सैफ व्यक्त झाला आहे.

‘फिल्म कम्पॅनियन’ला दिलेल्या मुलाखतीत सैफ म्हणाला, “मी इतका मोठा स्टार नाही की काहीही करून त्यातून निसटू शकतो. मी कधीच स्वत:ला एका मोठ्या स्टारच्या रुपात नाही पाहिलं. असं नाही की मला स्टार बनून राहणं पसंत नाही. मला आवडतं. पण मला कोणत्याही प्रकारच्या गैरसमजुतीत राहायचं नाही. माझे पालक मोठे स्टार आहेत. पण ते खूपच रिअलिस्टिक आणि नॉर्मल आहेत. आयुष्यात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यात रिअल राहणं गरजेचं असतं. माझा फोकस नेहमी त्यावरच राहिला आहे. मला असं म्हणायचं आहे की तुम्ही अपयशाने घाबरू नका.”

हे सुद्धा वाचा

यापुढे ‘आदिपुरुष’च्या अपयशाबद्दल सैफ पुढे म्हणाला, “काही लोक म्हणाले की तो चित्रपट निवडणं हा खूप धाडसी निर्णय होता, तर काही म्हणाले की मी खूप मोठा रिस्क घेतला आहे. पण जोवर तुम्ही तुमच्या तोंडावर पडत नाही, तोपर्यंत रिस्कला रिस्क म्हणणं चुकीचं ठरेल. जर एखादा चित्रपट फ्लॉप होत असेल तर तुम्हाला घाबरण्याऐवजी स्वत:ला समजावण्याची खूप गरज असते. तुम्ही स्वत:लाच सांगा की प्रयत्न चांगला होता. पण नशीब चांगलं नव्हतं. पुढच्या चित्रपटात आणखी मेहनत करेन. मी असंच करतो.”

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.