बाप सोबत नसल्याची खंत अखेर साराने बोलूनच दाखवली, ‘कोणी तुमच्यासाठी येत नाही, तुम्हीच…’

Sara Ali Khan | सैफ अली खानने फार लवकर सोडली पहिली पत्नी आणि दोन मुलांची साथ, 'सिंगल मदर'सोबत राहिलेली सारा म्हणाली, 'फार कमी वयात मी...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सारा अली खान हिच्या वक्तव्याची चर्चा...

बाप सोबत नसल्याची खंत अखेर साराने बोलूनच दाखवली, 'कोणी तुमच्यासाठी येत नाही, तुम्हीच...'
Follow us
| Updated on: Mar 15, 2024 | 8:16 AM

मुंबई | 15 मार्च 2024 : अभिनेता सारा अली खान हिने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं. प्रोफेशनल आयुष्यात सारा हिला यश मिळालं आहे, पण खासगी आयुष्यात सारा हिने अनेक चढ-उतारांचा सामना केला. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सारा हिने मोठं वक्तव्य केलं आहे. ‘कितीही काहीही झालं तरी, तुमच्यासाठी कोणी येत नाही…’ असं सारा म्हणाली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सारा अली खान आणि तिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत साराला, ‘तुझ्या आयुष्यात सशक्त महिलांचा प्रभाव काय आहे?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर सारा म्हणाली, ‘मला असं वाटतं सिंगल मदरसोबत राहणं सर्वात महत्वाची भूमिका आहे. फार कमी वयात मला कळलं होतं, की कोणी तुमच्यासाठी काहीही करणार नाही…’

‘असं काहीही नाही मला कोणाची मदत मिळाली नाही. मला मदत मिळाली, पण अखेर तुम्हीच तुमच्या आयुष्याचे संचालक असता… स्वतःहून काही गोष्टी घडून येतील असा विचार तुम्ही करत असाल तर, असं काहीही होत नाही…’ असं वक्तव्य सारा हिने केलं आहे.

मला स्वतःवर गर्व वाटतो – सारा अली खान

‘ए वतन मेरे वतन ‘ सिनेमात सारा हिची मुख्य भूमिका आहे. यावर अभिनेत्रीला विचारण्यात आलं. सारा म्हणाली, ‘प्रचंड उत्तम अनुभव होता. सिनेमात तुम्ही माझी अशी बाजू पाहाणार आहात, जी मी स्वतः कही पाहिली नाही. आज याठिकाणी मी एक गोष्ट बोलणार आहे, जी आजपर्यंत कधीही बोलली नाही. मला माझ्यावर गर्व वाटत आहे. ‘केदारनाथ’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर देखील माझी हिच भावना होती…’

साराचे सिनेमे

सारा लवकरच दोन सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. ‘ए वतन मेरे वतन’ आणि ‘मर्डर मुबारक’ सिनेमा सारा झळकणार आहे. सध्या सध्या तिच्या दोन सिनेमांमुळे चर्चेत आहे. चाहते देखील साराला नव्या भूमिकेत पाहाण्यासाठी प्रतीक्षेत आहेत.

सध्या सारा तिच्या दोन्ही आगामी सिनेमांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशनच्या माध्यमातून सारा तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. सारा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सारा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोश मीडियावर पोस्ट करत असते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.