Saif Ali Khan गेल्या ५ वर्षांपासून वापरत असलेली ‘ही’ गोष्ट; तुम्ही महिन्याला बदलत असाल
करीना कपूर हिने सैफ अली खान याचं मोठं सत्य आणलं समोर; पतीची अशी गोष्ट सांगितली जी, तो गेल्या पाच वर्षांपासून वापरत आहे...
मुंबई: अभिनेत्री करीना कपूर बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रींपैकी एक आहे. जवळपास गेल्या २३ वर्षांपासून करीना बॉलिवूडवर राज्य केलं आहे. करीनाने तिच्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं आहे. रुपेरी पडद्यासोबतच करीना सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. सोशल मीडियावर स्वतःचे आणि कुटुंबाचे फोटो शेअर करत अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. शिवाय मुलाखतींमध्ये देखील अभिनेत्री खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी सांगत असते. आता देखील अभिनेत्रीने पती आणि अभिनेता सैफ अली खान याचं मोठं सत्य चाहत्यांना सांगितलं आहे. सध्या करीनाने पतीबद्दल सांगितलेलं सत्य सर्वत्र चर्चेत आहे.
करीनाने एका मुलाखती दरम्यान सांगितलं की, ‘सैफ प्रचंड साधा राहतो. तो सलग पाच वर्ष एक ट्रॅप पॅन्ट घालू शकतो. जोपर्यंत त्याला कोणी सांगत नाही की तुझी ट्रॅप पॅन्ट आता फार जुनी झाली आहे. तेव्हा सैफ नवीन ट्रॅप पॅन्ट खरेदी करतो. कधी कधी तर सैफ पाच छेद असलेला टी-शर्ट देखील घालतो. ज्यावर तो म्हणतो छेद असतील तर काय झालं? ‘ ट्रॅप पॅन्ट तर सामान्य माणून देखील महिन्याला बदलत असेल, पण सैफ मात्र पाच वर्ष एकच ट्रॅप पॅन्ट वापरू शकतो.
पुढे करीना म्हणाली, ‘सैफ प्रचंड स्टायलिश आहे. ज्यासाठी त्याला फार काही करण्याची गरज भासत नाही. तो नैसर्गिकरित्या स्टायलिश आहे. स्टायलिश जी कोणती स्टाईल सांगेल सैफ त्या विरोधात सगळं काही करतो. कपडे. इंटीरियर, पदार्थ, उत्तम पुस्तकं, नयन रम्य ठिकाण त्याला आवडतात. कोणीच सैफ सारखी स्टाईल करु शकत नाही…’ असं देखील अभिनेत्री मुलाखतीत म्हणाली.
सैफ आली खान आणि करीना कपूर कायम त्यांच्या कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. दोघेही रॉयल आयुष्य जगतात. शिवाय करीना – सैफ यांची दोन मुलं तैमूर आणि जेह देखील चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असतात. लहान वयातच तैमूर आणि जेह यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अनेक ठिकाणी तैमूर आणि जेह यांनी पाहिल्यानंतर दोघांची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.
करीना कपूर हिच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच ‘द क्रू’ सिनेमाची शुटिंग सुरु करणार आहे. रिया कपूर हिच्या खांद्यावर सिनेमाच्या निर्मितीची जबाबदारी असल्यामुळे सिनेमा अत्यंत स्टायलिश असेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सध्या करीना तिच्या आगामी सिनेमांसाठी देखील चर्चेत आहे.