सैफ अली खानचे भुतांनी झपाटलेले घर; रात्रीतून करावं लागलं रिकामं, सोहाने सांगितला भयानक किस्सा
सैफ अली खानची धाकटी बहीण सोहा अली खानने त्यांच्या कुटुंबाच्या एका पिली कोठी नावाने प्रसिद्ध असलेल्या एका राजवाड्याबद्दल न ऐकलेली आणि धक्कादायक अशी गोष्ट सांगितली आहे. सोहाने हा राजवाडा भुतांनी झपाटलेला असल्याचं म्हटलं तसेच त्याबद्दलचे बरेच किस्सेही सांगितलं आहे.

सेलिब्रिटींच्या प्रशस्त आणि करोडोंच्या घरांच्या चर्चा तर नेहमीच होत असतात. तसेच त्यांच्या घरांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सर्व सेलिब्रिटींमध्ये जर जास्त चर्चा होणारं आणि सर्वात महागडं घरं किंवा पॅलेस म्हटलं तर ते सैफ अली खानचं. पतौडी कुटुंबाच्या पॅलेसबद्दलच्या गोष्टी नेहमीच समोर येत असतात. आता सैफ अलीच्या कुटुंबाच्या अजून एक राजवाड्याची विचित्री गोष्ट समोर आली आहे. त्याबद्दल सैफची बहीण सोहानेच भयानक किस्सा सांगितला आहे.
आजही त्या राजवाड्याची अवस्था खंडरच आहे
सोशल मीडियावर बोलल्या जाणाऱ्या गोष्टी व्हायरल होण्यास जास्त वेळ लागत नाही. अलीकडेच, सैफ अली खानची बहीण सोहा अली खाननेही तिच्या वडिलोपार्जित घराबद्दल असंच काहीसं सांगितलं आहे. अलीकडेच सोहा अमेझॉन प्राइमच्या ‘छोरी 2’ चित्रपटात दिसली. हा एक हॉरर चित्रपट आहे आणि सोहाने त्यात भूताची भूमिका साकारली आहे. त्याच्या प्रमोशन दरम्यान, तिने अशाच एका वास्तविक घटनेबद्दल सांगितलं. तिने सांगितले की त्याच्या कुटुंबाकडे एक राजवाडा आहे जो झपाटलेला आहे.त्यांना तो रात्रीतूनच रिकामा करावा लागला होता. आणि आजही प्रत्येकजण तिथे जाण्यास घाबरतो. आजही त्या राजवाड्याची अवस्था नीट नाही.
एका रात्रीत सर्वांना सामान बांधून तेथून निघून यावं लागलं
सैफ अली खानने देखील या वाड्याबद्दल एकदा सांगितले होते. त्यांच्या कुटुंबाचा एक जुना महल आहे जो भुतांनी पछाडलेला आहे आणि म्हणूनच तो रात्रभरात रिकामा करावा लागला होता. दरम्यान याबद्दल बोलताना सोहाने सांगितलं की ‘आम्ही पतौडीचे रहिवासी आहोत, आमचे हरियाणामध्ये घर आहे. तिथे एक राजवाडा आहे आणि त्याच्या शेजारी आणखी एक राजवाडा आहे, ज्याबद्दल लोकांना कदाचित माहिती नसेल. त्याचे नाव ‘पीली कोठी’ आहे. आमचे कुटुंब पूर्वी तिथे राहत होते पण एकदा एका रात्रीत असं काही घडलं की अचानक सर्वांना सामान बांधून तेथून निघून यावं लागलं होतं. यानंतर सगळे दुसऱ्या राजवाड्यात राहू लागले ज्याला तुम्ही लोक पतौडी पॅलेस म्हणून ओळखता.” पुढे, सोहाने अचानक हा राजवाडा रिकामा करण्याची धोकादायक कहाणी देखील सांगितली, जी खरोखरच धक्कादायकच आहे.
View this post on Instagram
“भूत त्यांना थप्पड मारायचे”
सोहा पुढे म्हणाली, ‘तिथून अचानक बाहेर येण्याचे कारण तिथली अलौकिक शक्ती होती. मी तेव्हा तिथे नव्हते. पण लोकं असं म्हणतात की त्या राजवाड्यात राहणाऱ्या लोकांना अचानक कोणीतरी येऊन थप्पड मारायचं. भूत त्यांना थप्पड मारायचे आणि त्यांच्या चेहऱ्यावर भुतांच्या हाताच्या खुणा राहायच्या. माझ्या पणजीलाही एका भूताने थप्पड मारली होती. मला माहित नाही की त्यावेळी नेमकं काय घडलं होतं, तो राजवाडा एक प्राइम रियलस्टेट आहे, पण ती वास्तू अजूनही रिकामीच आहे. ते पूर्ण खंडर झालं आहे. आजही त्या ठिकाणी लोक राहत नाहीत आणि तिथे कोणीही राहत नाही याचे काहीतरी कारण असेल. असं म्हणत सोहाने त्या राजवाड्याचे किस्से सांगितले.
सोहाचे भूमिकेबाबत कौतुक
कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, सोहा लवकरच सैफ अली खान, जयदीप अहलावत आणि कुणाल कपूर यांच्यासोबत ‘ज्वेल थीफ’ मध्ये दिसणार आहे. याशिवाय, तिच्याकडे ‘देवरा 2’ देखील पाइपलाइनमध्ये आहे. सोहाने अनेक वर्षांनी ओटीटीवर पुनरागमन केले आहे. ती नुसरत भरुचासोबत ‘छोरी 2’मध्ये दिसली. या चित्रपटातील सोहाच्या कामाचे खूप कौतुक होत आहे. हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहता येईल.